आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वगळलेले बलराम यादव यांना पुन्हा यूपी मंत्रिमंडळात स्थान, तीन नव्या चेहऱ्यांना संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी मंत्रिमंडळाचा सातवा विस्तार करताना काही दिवसांपूर्वीच वगळलेल्या बलराम यादव यांना पुन्हा स्थान दिले आहे. तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री मनोजकुमार पांडे यांना वगळण्यात आले आहे. राज्यात २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून त्यापूर्वीचा हा शेवटचा विस्तार ठरण्याची शक्यता आहे.

राज्यपाल राम नाईक यांनी राजभवनात मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात तीन कॅबिनेट, तर दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. बलराम यादव आणि नारद राय यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. तिसरे कॅबिनेट मंत्री झियाउद्दीन रिझवी हे उपस्थित राहू शकले नाहीत. ते नंतर शपथ घेतील. एकेकाळचा गँगस्टर मुख्तार अन्सारी याच्या कौमी एकता दल या पक्षाचे समाजवादी पक्षात विलीनीकरण करण्यासाठी पुढाकार घेणारे बलराम यादव यांना अखिलेश यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. मात्र, समाजवादी पक्षाच्या संसदीय मंडळाने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस केली होती.

अखिलेश यांच्याशी मतभेद; शिवपाल यादव गैरहजर
मंत्रिमंडळातीलज्येष्ठ मंत्री आणि अखिलेश यांचे काका शिवपाल यादव हे शपथविधी समारंभाला अनुपस्थित होते. त्यांनी गेल्या आठवड्यात कौमी एकता दलाचे समाजवादी पक्षात विलीनीकरण झाल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अखिलेश त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. पक्षाच्या संसदीय मंडळाने विलीनीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा काय म्हणाले अमित शहा
बातम्या आणखी आहेत...