आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायावतींवर मौर्यचा हल्ला; हजार कोटी कसे आले? सप्टेंबरमध्ये घेणार जाहीर सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- २०१२मध्ये सरकार गेल्यानंतर मायावतींच्या कुटुंबाच्या ५० कंपन्यांकडे हजार कोटी रूपये आले.. ते कसे ? हे पैसे तिकिट विक्रीतून आले नाहीत का? मायावतींनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे, अशा शब्दांत बसपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या स्वामीप्रसाद मौर्य यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मी उत्तर प्रदेशात पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्यात त्यांनी २२ सप्टेंबरला लखनऊमध्ये जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. पैशांच्या लोभात कांशीराम यांच्या चळवळीचे नुकसान केले, असा आरोप त्यांनी मायावतींवर केला. दलित उमेदवाराकडून दीड ते दोन कोटी रुपये तिकिटासाठी घेतले जातात, असा दावा त्यांनी केला. दलितांचे मत विकून लाखो कोटी रुपये कमावणाऱ्या मायावती विजय माल्यासारखे देश सोडून पलायन करू शकतात, असा आरोपही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...