आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Committed Riots For Wining Election Rahul Gandhi

निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष दंगली घडवतात - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगढ - मुजफ्फरनगर दंगलीमागे राजकीय पक्षांचा हात होता. दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत, असे या पक्षांना वाटते, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि भाजपवर हल्ला चढवला. अलिगढ येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी अखिलेश सरकारवरही टीकेची झोड उठवली.


राजकीय फायद्यासाठी लोकांना एकमेकांविरुध्द लढवले जाते. कारण येथील जनतेत फूट आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भांडणे लावली जातात, असे राहुल म्हणाले. मात्र, त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव घेतले नाही. सामान्य जनतेला दंगली नको आहेत; परंतु दंगली घडवल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी काही राजकीय पक्षांची भावना आहे, तेच हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावतात, असा आरोप त्यांनी केला.

मुजफ्फरनगरमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीमागे सपा-भाजपचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दंगलीत 62 बळी गेले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी दंगली घडवल्या असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल म्हणाले की, जनतेची भक्कम एकजूट होत नाही तोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होणार नाही. एकजूट होण्यासाठी काँग्रेस तुम्हाला मदत करेल, तुमच्या हक्कांसाठी लढेल, असे आश्वासन त्यांनी दिले.


अखिलेश सरकारचा वचनभंग
निवडणुकीपूर्वी सपाने अनेक आश्वासने दिली होती; परंतु अखिलेश सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असे सांगून भूसंपादन कायदा संसदेत संमत करून आपण दिलेले वचन पूर्ण केले, याची आठवण राहुल यांनी करून दिली.