आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडच्या खर्चासाठी अध्यादेश,काँग्रेसचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / नैनिताल- उत्तराखंडमध्ये नवीन आर्थिक वर्षासाठी राज्याच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी संबंधित अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. काँग्रेसने नैनितालच्या उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

विधानसभेत १८ मार्च रोजी अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याची घोषणाही केली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या हा अध्यादेश घटनाबाह्य आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. मुखर्जी यांनी गुरुवारी रात्री या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अध्यादेश मंजूर करण्यात आला होता.

राष्ट्रपतींनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केले आहे. जेणेकरून केंद्र सरकार उत्तराखंडच्या खर्चाची व्यवस्था करू शकेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीने अधिवेशनाच्या स्थगितीची मागणी केली होती.