आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics : Karunanidhi Son Alagiri Ready For Compromise

राजकारण: करूणानिधींचा मुलगा अळगिरी तडजोडीस तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र अळगिरी यांनी जुळवून घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आपली वाद मिटवण्याची तयारी आहे, मात्र त्यासाठी काही अटी असल्याचे ते म्हणाले. अळगिरी यांनी गुरुवारी आपला 63 वा वाढदिवस साजरा केला. अळगिरी यांच्या बडतर्फीनंतर पक्षाच्या तीन खासदारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.


पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे काय, या प्रश्नावर अळगिरी यांनी पहिल्यांदा आपल्या समर्थकांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. मदुराईचे माजी उपमहापौर पी. एम. मन्नन यांचा निलंबित केलेल्या दहा नेत्यांमध्ये समावेश आहे. पक्षाने मागण्या मान्य केल्यास चर्चेला तयार आहे. समर्थकांशी चर्चा केल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, असे ते म्हणाले.


अळगिरी यांनी एके दिवशी घरी येऊन लहान भाऊ, स्टॅलिनचा तीन महिन्यांत मृत्यू होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप करुणानिधी यांनी केला आहे. यानंतर अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, अळगिरी यांच्या वाढदिवासनिमित्त त्यांच्या समर्थकांनी मदुराईत शक्तिप्रदश्रन केले. शहरात वाढदिवसाच्या पोस्टर्सवर अळगिरी यांचा उल्लेख ‘हिरो ऑफ जस्टिस’ असा करण्यात आला होता. द्रमुक खासदार डी. नेपोलियन, खासदार के.पी. रामलिंगम आणि खासदार जे. के. रितेश यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.