आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Language Slide Down Because Of BJP Leaders Manmohan Singh

बोलघेवड्या भाजप नेत्यांमुळे राजकारणाची पातळी घसरली, मोदींवर मनमोहनसिंगांची अप्रत्यक्ष टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - भाजपचे बोलघेवडे नेते देशातील राजकारणाची पातळी अगदी रसातळाला नेण्याचे काम करत आहेत, असा आरोप पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला आहे. जबलपूर येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना डॉ. सिंग यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार
टीका केली.
जाहीर सभेत बोलताना सिंग म्हणाले की,भाजप नेते इतरांना कायम पाण्यात पाहण्याचे काम करतात. त्यांना चांगले काही दिसतच नाही. इतरांना कमी लेखणारे देशाला पुढे नेण्याऐवजी कुठे नेतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजप नेते जाहीर सभांमध्ये बेजबाबदार विधाने करतात, भाषण देतात. जबाबदार पदांवर बसलेल्या व जबाबदार पदावर बसण्याची स्वप्ने बघणा-या नेत्यांनी विचारपूर्व बोलावे, तोलूनमापून बोलले पाहिजे, असा सल्लाही पंतप्रधानांनी मोदींना त्यांचे नाव न घेता दिला. भाजपचे नेते विकासाच्या गप्पा मारतात. परंतु त्यांना हे माहीत असले पाहिजे की, भारतातील विविध भागांसाठी विकासाच्या विविध प्रतिमाणांची
गरज आहे.
महान नेत्यांचे अनुकरणही करा
या सभेत मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मला हे पाहून बरे वाटले की, भाजपचे नेते महान नेत्यांचे, त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत, परंतु त्यांनी केलेल्या कामाचे, कर्तव्य कठोरतेचेही त्यांनी अनुकरण करावे. ऐतिहासिक बाबी वाढवून सांगण्याची भाजप नेत्यांना सवय लागली आहे. ते चक्क इतिहास बदलण्याचाच प्रयत्न करत आहेत, परंतु त्याऐवजी
त्यांनी महान नेत्यांच्या कामाचे अनुकरण करावे.