आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Naxal Connection: Minister Makes Missing Own Bodyguard\'s Weapons To Give To Maoists

नक्षलवाद्यांना देण्यासाठी मंत्री महोदयांनी स्वतःच्या सुरक्षारक्षकांची शस्त्रे केली पसार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडचे मंत्री जयप्रकाशभाई पटेल यांच्या सुरक्षारक्षकांची शस्त्रे कुख्यात नक्षल कमांडर अजय महंतोला देण्यासाठी गायब करण्यात आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक काळात मंत्री महोदयांनी नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र देण्याचे आश्वासन दिले होते.
वरिष्ठ पातळीवरील हे प्रकरण असल्याने कोणीही, काहीही बोलण्यास तयार नाही. मात्र आतापर्यंतच्या तपासातून पटेल यांच्याकडेच संशयाची सुई वळत आहे. त्यांच्या खासगी सचिवाच्या चौकशीत सत्य उघड होईल, असा विश्वास पोलिसांना व्यक्त आहे.
पटेल यांचे सुरक्षारक्षक 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे खासगी सचिव अनिल राय यांच्याकडे भोजनासाठी गेले होते. त्यांच्याकडून परतताना ते हजारीबागच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होती. या दरम्यान विशेष शाखेचा कॉन्स्टेबल नवनीत तिवारी याने सर्वांची शस्त्रास्त्रे एकत्र करून पसार केली. 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोन शस्त्रे जप्त केली मात्र एका रिव्हॉल्व्हरचा अजूनही शोध लागलेला नाही.
या तपासादरम्यान पोलिसांना काही खळबळजनक माहिती मिळाली आहे. अशीही माहिती आहे, की बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)च्या विष्णूगड भागातील एरिया कमांडरला शस्त्र देण्यासाठी मंत्री पटेल यांनीच हा कट रचला होता. पटेल यांना निवडणुकीत नक्षलींची मदत हवी होती त्याबदल्यात त्यांनी शस्त्र पुरविण्याचे आश्वासन दिले होते.
पोलिसांनी कॉन्स्टेबल नवनीत तिवारीला अटक केली आहे. त्याने चौकशीत सांगितल्यानुसार, शस्त्रे गायब करण्यात अपयश आले असते तर सुरक्षा रक्षक भुसुरुंगाचा बनाव रचून हे काम स्वतःच पूर्ण करणार होते.
पटेल यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. माझ्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, स्वतःच्या पसंतीने निवडले सुरक्षारक्षक