आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनला भारतरत्न देण्‍यावरुन भडकले जेडीयू खासदार, नितीश कुमारांचे मात्र समर्थन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्‍कार देण्‍यावरुन राजकारण सुरु झाले आहे. देशातील प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरची निवड कशी काय झाली? असा प्रश्न संयुक्त जनता दलाचे खासदार शिवानंद तिवारी यांना यांनी केला आहे. तर त्‍यांच्‍याच पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र विरोधी भूमिका घेत निर्णयाचे समर्थन केले आहे. नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्‍कार देण्‍याच्‍या मागणीलाही समर्थन दिले आहे. फारुख अब्‍दुल्‍ला यांनीही या मागणीला समर्थन दिले आहे.

शिवानंद तिवारी यांना सचिनला भारतरत्न देण्‍यावरुन संताप व्‍यक्त केला आहे. ते म्‍हणाले, या पुरस्कारासाठी ध्यानचंद यांचाही विचार झाला होता. पण, त्यांच्याआधी सचिनला पुरस्कार का दिला गेला? तिवारी म्हणाले, सचिन मोफत क्रिकेट खेळलेला नाही. देशात क्रिकेटच्या प्रसारासाठी उद्योगांना मदत करून सचिनने कोट्यावधी कमविले आहेत. याउलट सध्याची ध्यानचंद यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देशाला हॉकीमध्ये जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी पोहचविले. ध्यानचंद यांच्या खेळीवर जर्मनीचा हुकुमशहा देखील भारावला होता. भारतरत्न आता जणूकाही विनोदाचा विषय झाला आहे. आता त्‍याचे काहीही औचित्‍य राहिलेले नसून हा पुरस्‍कारच देणे बंद केले पाहिजे, असेही तिवारी म्‍हणाले.