आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Polling Picks Up After Slow Start In 16 Assembly Seats In Kashmi

दहशतवाद्यांना न जुमानता मतदारांमध्ये उत्साह, जम्मू-काश्मीरमध्ये तिसर्‍या टप्प्यात मतदान सुुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामूला, बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यातील 16 व्या विधानसभा जागांसाठी तिस-या टप्प्यात मंगळवारी (ता.9) मतदान होत आहे. दहशतवाद्यांना न जुमानता मतदार घराबाहेर पडले आहे. मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मतदानास सकाळी 8 वाजता मोठ्या बंदोबस्तात सुरूवात झाली. कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी दिसली. पण दुपारच्या सत्रामध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीला न घाबरता मतदार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
उरी, बडगाम आणि बारामूला या ठिकाणांवर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ले झाले होते. तरी देखील येथे मतदानासाठी मोठी रांग पाहण्यास मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत 43 % मतदान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

13 लाख मतदार, 138 उमेदवार
तिस-या टप्प्यातील मतदानासाठी 13 लाखांपेक्षा अधिक मतदार आणि 138 उमेदवारांचे राजकिय भविष्याचा फैसला होणार आहे. 138 उमेदवारांपैकी 64 उमेदवार करोडपती आहेत. तर 9 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. एकूण 13 लाख मतदारांमध्ये 6 लाखांपेक्षा अधिक महिला मतदार आणि 19575 प्रवासी मतदार आहेत.

सर्वाधिक पोलिंग बूथ बारामूलामध्ये
तिस-या टप्प्यातील मतदानासाठी सर्वात अधिक 825 मतदान केंद्र बारामूला जिल्ह्यात बनवण्यात आले आहेत. येथे 591875 मतदार आहेत. बडगाम जिल्ह्यामध्ये 445208 मतदारांसाठी 547 मतदान केंद्र आणि पुलवामा जिल्ह्यातील 332019 मतदारांसाठी 409 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.

तिस-या टप्प्यातील मतदानासाठी बारामूला जिल्ह्यातील उरी, राफियाबाद, सोपोर, बारामूला, गुलमर्ग, पाटन आणि संगरामा निवडणुक क्षेत्र तसेच बडगाम जिल्ह्यातील चादूरा, बडगाम, बीरवा, खानसाहिब आणि चरार-ए-शरीफ जिल्ह्यातील त्राल, पोम्पोर, पुलवामा आणि राजपुरा या जागांसाठी सध्या मतदान सुरू आहे. बडगाम जिल्ह्यातील बीरवामधून मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला निवडणुक लढवत आहेत.

सर्वाधिक 15 उमेदवार सोपोरमधून
तिस-या टप्प्यात होणा-या या मतदानासाठी सर्वात अधिक 15 उमेदवार सोपोर मतदार संघातुन मैदानात आहेत. राफियाबाद आणि पाटन येथून 12-12, बारामूलामधून 11, संगरामा आणि पुलवामामधून 10-10, गुलमर्ग, चरार-ए-शरीफ आणि राजपुरामधन प्रत्येकी 8, चंदूरा, बडगाम आणि त्रालमधून प्रत्येकी 7 बीरवा, खान साहिब आणि पोम्पोरमधून प्रत्येकी 6 आणि
सर्वात कमी 5 उमेदवार उरी मतदार संघातून मैदानात आहेत.
पाकिस्तानने पुन्हा केले सीज फायर उल्लंघन
तिस-या टप्प्यातील मतदानाआधी सोमवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या हमीरपूर जिल्ह्यातील पुंछ सेक्टरमध्ये रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सतर्फे फायरिंग करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये कुणाची जखमी झालेले नाही. सेनेच्या अधिका-याने सांगितले की, साधारण 10 मिनिटे पाकिस्तानतर्फे गोळीबार करण्यात आला.

पुढील स्लाइडवर पाहा तिस-या टप्प्यातील मतदानाची छायाचित्रे...