आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन युवकांचे संशोधन आविष्कार; पंकजने बनवला थ्रेशर तर सुधीरने प्रदूषणरोधक यंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेवाडी/गिद्दी- फक्त नववी आणि दहावीचे शिक्षण घेतलेल्या देशातील दोन युवकांनी संशोधन आविष्काराने तरुणांसामोर आदर्श उभा केला आहे. हरियाणाच्या सुधीरने प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकणारे यंत्र तर झारखंडच्या पंकजने धान्य काढण्याचे थ्रेशर यंत्र बनवले आहे. हरियाणाच्या भांडौरचा रहिवासी असलेल्या सुधीरने बनवलेले यंत्र मोटारसायकलला लावून सुमारे 30 टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी करता येऊ शकते. प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी प्रमाणित असलेल्या यंत्रानेसुद्धा सुधीरने बनवलेले यंत्र प्रमाणित करून त्याच्या यशस्वितेचे प्रमाण दिले आहे. दुसरीकडे, पंकज रवी कुमारने अडगळीत पडलेले ट्रान्सफॉर्मर, सीडीचे पार्ट्स, पंखा, तुटलेला टेबल, कार्टून, मॅग्नेटच्या साहाय्याने थ्रेशर मशीन तयार केले आहे. विजेवर चालणाºया या थ्रेशर यंत्राद्वारे धान्यातील खडे वेगळे होतात.

आईचा त्रास पाहवला नाही म्हणून बनवले थ्रेशर : झारखंडच्या गिद्दी गावात नवव्या वर्गात शिकत असलेल्या पंकज कुमार रवी कुमारला तांदूळ निवडताना आईला होणारा त्रास पाहावला नाही आणि त्याने थ्रेशर बनवून टाकले. त्याने बनवलेल्या थ्रेशरला चार मोटारी लावल्या असून त्यावर एक बॉक्स बसवण्यात आला आहे. यापैकी तीन मोटारी व्हायब्रेशनचे कार्य करतात, तर एका मोटारने मशीनमध्ये पंखा चालतो. पंख्यामुळे मशीनमध्ये टाकलेल्या तांदळाचा भुसा उडून जातो.

तीन मोटारीच्या साहाय्याने होणाºया व्हायब्रेशनमुळे जाळीत पडलेले खडे, तांदळाचे तुकडे खालच्या बॉक्समध्ये जातात. त्यापैकी निवडलेले तांदूळ एका अन्य बॉक्समध्ये साठवले जातात. मशीनमध्ये मॅग्नेट लावले असल्याने लोखंडाचे तुकडेही आपोआप दुसºया बॉक्समध्येच पडतात.