आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP निवडणूक: राजकीय पक्षांकडून मोफत वस्तू; स्मार्टफोन, एक जीबी डाटा, प्रेशर कुकरची खैरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. यात देशी शुद्ध तूप, स्मार्टफोन, लॅपटॉप, सायकल, इंटरनेट डाटा, प्रेशर कुकर आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी अशी आश्वासने आहेत. हा केवळ जाहीरनामाच नसून प्रत्येक सभेत याचा अावर्जून उल्लेख केला जातो आहे.  
 
दर महिन्याला शुद्ध देशी तूप, लॅपटॉप आणि स्मार्टफोन  मोफत : समाजवादी पक्षाने या वेळी आपल्या  जाहीरनाम्यात १० वी व १२ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना  मोफत लॅपटॉपसह  स्मार्टफोन देण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार डिंपल यादव यांनी महिलांना प्रेशर कुकर देण्याची घोषणा केली आहे.
 
महिलांना कुकर देऊन त्यांचा वेळ वाचावा असा आमचा प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसने जाहीरनाम्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना कर्ज आणि वीजबिल माफीचे आश्वासन दिले. तर सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल निम्मे देण्याचे आश्वासन दिले. 

भाजपने उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी सपाच्या एक पाऊल पुढे जाऊन लॅपटॉप फुकट देण्याबरोबरच एक जीबी डाटा मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.  
 
मायावती रोख रक्कम वाटणार : बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, आम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोन देणार नाही तर तितकाच पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा करू. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...