जयपूर - बिग बॉस-5 मधील स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने जयपूरमधील तीन जणांवर गँगरेपचा गंभीर आरोप केला आहे.त्यासोबतच एका बिझनेसवूमनवर दोन लाख रुपये चोरीचा आरोप केला आहे. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करुन घेत एफआयआर दाखल केला असून तिचे मेडिकल केले आहे.
काय आहे नेमके प्रकरण
>> अॅक्ट्रेस पूजा मिश्राचा आरोप आहे 13 जून रोजी आरोपी मोहसीन, सुहान आणि हरीश यांनी जयपूर येथील मोदीडूंगरी येथील उनियारा हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत गँगरेप केला.
>> बुधवारी पूजाने मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे पैशांच्या व्यवहाराचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.
>> दुसरीकडे, पूजावर आरोप झाला आहे. येथील राजापार्क परिसरातील स्टाइल अँड सीजर्सच्या ओनर रितू देसवाल यांनी पूजावर सलूनमध्ये दिलेल्या सेवा आणि सुविधेचे दीड लाखांचे बिल न देता धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
>> रितूचा आरोप आहे की पूजाने 10 आणि 11 जून रोजी सलूनमध्ये एका टीव्ही शोच्या शुटिंगसाठी आणि कॉन्फ्रन्ससाठी संपर्क केला होता.
>> त्यासाठी पूजाने सलूनमधील महागडे प्रॉडक्ट वापरले, कर्मचाऱ्यांकडून मेकअप करुन घेतला. त्यासोबत इतर सुविधांचाही यथेच्छ वापर केला. या सर्वांचे दीड लाख रुपये बिल झाले होते. पूजा कडे बिलाची मागणी केल्यानंतर एका युवकाने फोन करुन दोन लाखांच्या चोरीचा आरोप करुन पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली होती.
>> याच प्रकरणात पूजानेही क्रॉस कम्प्लेन देत रितूवर दोन लाख रुपये चोरीचा आरोप केला आहे.
कोण आहे पूजा मिश्रा
- पूजाने करियरची सुरुवात एंकरिंगपासून केली होती.
- त्यानंतर बिग बॉस-5 मध्ये ती सहभागी झाली होती. त्याआधी बिग स्विच या रियालिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता.
- दिल का रिश्ता सारख्या चित्रपटातही तिने काम केले आहे. त्यासोबतच अनेक मॅग्जिनच्या कव्हरपेजवरही ती झळकली आहे.
- काही चित्रपटांमध्ये अॅटम नंबरही पूजाने केले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सनी लियोनीवर केला 100 कोटींचा दावा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)