आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहजतेने अॅक्सेस होताहेत PORN वेबसाइट्स; बॅन आदेश केवळ बुजगावणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
ही बातमी तुम्‍ही वाचण्‍याच्‍यापूर्वी आम्‍ही स्‍पष्‍ट करतो की, सिस्‍टममध्‍ये असलेल्‍या उणिवा लक्षात आणून त्‍यात सुधारणा व्‍हाव्‍या आणि पोर्नोग्राफी साइट्सबंद व्‍हाव्‍यात, हाच आमचा मुख्‍य उद्देश आहे. या उणिवामुळेच बॅन केलेल्‍या साइट्सही अगदी सहजतेने उघडत आहेत. त्‍यामुळे पोर्न साइट्स बॅन करण्‍याविषयी सरकार खरच गंभीर आहे का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

लखनौ – केंद्र शासनाने शुक्रवारी सर्वच इंटरनेट सर्व्‍हीस प्रोव्‍हाइडर्सला (आयएसपी) 857 पोर्न वेबसाइट्सची यादी पाठवून त्‍यांना बॅन करण्‍याचे आदेश दिलेत. मात्र, या यादीतील सर्वच साइट्स काही इंटरनेट सर्व्‍हीस प्रोव्‍हाइडर्सच्‍या माध्‍यमातून सहजतेने ओपन होत आहेत. तसेच ज्‍या आयएसपीने या वेबसाइट्सला ब्‍लॉक केले आहे, त्‍याच ठिकाणी पोर्न वेबसाइट्स पाहण्‍यासाठीचा पर्यायसुद्धा इंटरनेटवरच दिलेला आहे. divyamarathi.com ने जेव्‍हा केंद्र सरकारच्‍या बॅन ऑर्डरची पडताळणी केली तेव्‍हा आवाक् करणारे काही खुलासे समोर आले आहेत.

इंटरनेटवर अनेक अशा वेबसाइट्स आहेत ज्‍या की प्रॉक्सी सर्व्‍हरचे काम करतात. या वेबसाइट्सचा दावा आहे की, ब्‍लॉक केलेल्‍या वेबसाइट त्‍यांच्‍या माध्‍यमातून अगदी सहतेने अॅक्सेस होतात. विशेष म्‍हणजेही तेही तुमची ओळख लपवून. ही प्रॉक्सी वेबसाइट तुमच्‍या कॉम्प्यूटरवर कुकीही राहू देत नाही. त्‍यामुळे या प्रॉक्सी वेबसाईटच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही कोणती वेबसाईट अॅक्सेस केली हेही कुणाला अजिबात कळत नाही.

सहजतेने मिळाला पोर्न वेबसाईटचा अॅक्सेस
शासनाकडून बॅन केलेल्‍या काही पोर्न वेबसाइटचा यूआरएल या प्रॉक्सी वेबसाइटवर टाकला असता त्‍या अगदी सहजतेने कॉम्‍प्‍युटरवर उघडल्‍या गेल्‍या. त्‍यामुळे शासनाच्‍या दाव्‍यातील फोलपणाही उघड झाला. परिणामी, वेबसाइट्स बॅन करण्‍याचे आदेश म्‍हणजे केवळ देखावा आहे, हे स्‍पष्‍ट झाले. प्रयोगिक तत्‍त्‍वावर bangbros.com आणि hindiold.com ला अॅक्सेस केले. सरकारच्‍या आदेशाने बॅन करण्‍यात आलेल्‍या आयएसपीवर त्‍यांचा सहतेने अॅक्‍सेस मिळाला.
काय आहे वेब प्रॉक्सी सर्व्‍हर
ब्लॉक केलेल्‍या साइट्स ओपन करण्‍याची पळवाट म्‍हणजे वेब प्रॉक्सी सर्व्‍हर आहे. तुमचा कम्प्युटर आणि इंटरनेटच्या दरम्यान काम करणारा कम्प्युटर हा प्रॉक्सी सर्व्हर असतो. तुम्ही कुठलीही वेबसाइट अॅक्सेस करता, तेव्हा त्या साइटला कळविला जाणारा आयपी अॅड्रेस प्रॉक्सी सर्व्हरचा असतो; तो तुमचा खरा आयपी अॅड्रेस नसतो. एक प्रॉक्सी सर्व्हर एकापेक्षा अधिक (हजारो) कॉम्प्युटरसाठी काम करतो. कारण तो कुठल्याही विशिष्ट कॉम्प्युटरसाठी राखीव नसतो. या माध्‍यतून अगदी सहजनेते पोर्न साइड्स ओपन होत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा बॅनसाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला होता नकार...