आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीची नवरात्रीसाठी कंडोम अॅड, होर्डिंगच्या सुरक्षेत उभे 15 जवान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - गुजरातमध्ये सनी लियोनीच्या कंडोम अॅडवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. वास्तविक, नवरात्रीवर होणाऱ्या गरब्याशी जोडून ही जाहिरात दाखवण्यात आली आहे. प्रचंड विरोध होऊ लागल्यावर 15 पोलिस कर्मचारी अॅडच्या होर्डिंगच्या सुरक्षेसाठी 2 तास उभे राहिले. नंतर या होर्डिंगला हटवण्यात आले.
 
सोशल मीडियावर व्हायरल...
- खरेतर, सुरतमध्ये एका कंडोम ब्रँडचे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
- नवरात्रीच्या आसपास ही अॅड प्रसिद्ध झाल्याने सोशल मीडिया युजर्स आणि शहर संघटनेने हरकत नोंदवली होती.
- त्यांचे म्हणणे होते की, सनी लियोनीच्या कंडोम अॅडमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे ही जाहिरात त्वरित हटवण्यात यावी.
- तथापि, गुजरातमध्ये नवरात्र सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे. ज्यात 9 दिवसांसाठी देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते.
- या दिवसांत गरबा खेळणे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीत गरबा नृत्योत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...