आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी गोड बोलून तरुणीला हॉटेलात नेले, मग नराधमाने बापाला दिली ही धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या वडिलांना ब्लॅकमेल केले. - Divya Marathi
आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या वडिलांना ब्लॅकमेल केले.
हाजीपूर - बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सोनपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचे प्रकरण समोर आले आहे. अगोदर तरुणाने मुलीला गोड-गोड बोलून फूस लावली आणि हॉटेलात नेले. तेथे तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या वडिलांनाच लग्नासाठी ब्लॅकमेल करू लागला. मुलीचा बाप लग्नासाठी तयार होत नसल्याचे पाहून आरोपीने हा व्हिडिओ त्यांना तर पाठवलाच, सोबतच व्हायरलही केला.
 
असे आहे प्रकरण..
 - मुलीच्या वडिलांनी पोलिसांत निवेदन दिले. निवेदनात त्यांनी लिहिले की, माझी मुलगी कोचिंग करण्यासाठी गेली होती.
 - दरम्यान, फूस लावून पवन नावाच्या तरुणाने मुलीला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.
 - व्हिडिओ बनवल्यानंतर मला धमकी दिली की, पवनशी तुझ्या मुलीचे लग्न लाव, अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करून टाकू.
 - मग मी पोलिसांत तक्रार दिली, पण दबावामुळे पुन्हा परत घेतली.
 - मग मला धमकी मिळाली की, तू तुझ्या मुलीचे लग्न पवनशी का नाही लावले?
 - तुझ्या मुलीचा अश्लील व्हिडिओ या जागी विकला जात आहे. जाऊन पाहा. मी तेथे गेलो तर एक तरुण पैसे घेऊन मुलीचा व्हिडिओ विकत होता.
 - पीडितेने वडिलांना लिहिले की, व्हिडिओ व्हायरल झाल्याने जीवन नरक बनले आहे.
 
दोघांना अटक, हॉटेल सील
 - मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन मुलांना शनिवारी अटक केली.
 - तरुणांकडे 2 लॅपटॉपही आढळले. याप्रकरणी 7 जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी व्हिडिओचे चित्रण झालेले हॉटेलही सील केले आहे. 
 - पोलिस म्हणाले की, अगोदर सामाजिक दबावामुळे हे प्रकरण दबले होते, परंतु पीडितेच्या अश्लील व्हिडिओचे भय दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू होते. नंतर तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
 - मग मात्र कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...