आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाथ मारून तोडला राम रहीमच्या बेडरूमचा दरवाजा, पाहा आतील नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी लाथ मारून बेडरूमचे दार तोडले. - Divya Marathi
पोलिसांनी लाथ मारून बेडरूमचे दार तोडले.
चंदिगड - साध्वी बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची कैद झालेल्या बाबा राम रहीमची संपत्ती पोलिसांनी सील करणे सुरू केले आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, यात बाबाच्या पंचकुलामधील आलिशान घरातील बेडरूमचे दरवाजे पोलिस लाथ मारून तोडताना दिसत आहेत.
- खरेतर, 27 ऑगस्टला ड्यूटी मॅजिस्ट्रेट यांच्यासह पोलिसांनी बाबाच्या सेक्टर 23 आणि सेक्टर 15 मधील घरांना सील केले आहे.
- सेक्टर 23च्या घरातून पोलिसांना तपासणी करताना मोठ्या प्रमाणात लाठ्या-काठ्या आढळल्या.
- येथे मोठ्या संख्येने छत्र्याही मिळाल्या. यांचा वापर हत्यारासारखा करण्यात आला होता.
 
लक्झरी लाइफने युक्त पंचकुलामधील चर्चा घर सील...
- पोलिसांना तपासात आढळले की डेऱ्याच्या टॉप फ्लोअरवर दोन वेगवेगळ्या व्हीव्हीआयपी रूम आणि एक हॉल बनवण्यात आला होता.
- या मजल्यावर कोणत्याही पदाधिकाऱ्याला येण्याची परमिशन नव्हती. या आलिशान खोल्यांत महागडे इंटेरिअर लावण्यात आलेले आहे.
- यासोबतच फर्निचर, सोफ्यासहित अनेक महागडे बेडही आढळले. येथे ठेवलेले सर्व सामान इंपोर्टेड आहे. याची किंमत लाखांमध्ये आहे. असे म्हणतात की, जेव्हा बाबा गुरमित हिमाचलकडे जायचा, तेव्हा गुप्त रूपाने येथे राहायचा. तो या कमऱ्यांतच राहायचा, याशिवाय अन्य कुणीही राहत नव्हते.
- राम रहीमला सीबीआय कोर्टाने सुनावलेल्या 10-10 वर्षांच्या दोन शिक्षांनंतर आता त्याच्याकडे फक्त हायकोर्टात जाण्याचा पर्याय आहे. डेराप्रमुखाकडे अपील करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी आहे. सूत्रांनुसार, अपील दाखल करण्यासाठी कोणताही उशीर होऊ नये म्हणून आतापासूनच तयारी करण्यात आली आहे, बहुतेक याच आठवड्यात त्याच्या अपिलावर सुनावणी होऊ शकते.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, बाबाच्या लक्झरियस बेडरूमचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...