आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Possibility Of Hang To Neck Of Devindener Pal Singh Bhullar

पंजाबात पोलिस फौजफाटा, भुल्लरला फाशीची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- पंजाबात सीमा सुरक्षा दलाच्या पाच आणि शीघ्र कृतिदलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. राज्यातील पोलिसांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेबाबतही जिल्हा प्रशासनाकडून दिवसातून दोन वेळा अहवाल घेतला जात आहे. त्यामुळे देविंदरपाल सिंग भुल्लरला लवकरच फासावर लटकावले जाण्याची शक्यता वाढली आहे.

पंजाबने केंद्राकडे निमलष्करी दलांची मागणी केली होती. मंगळवारी शीघ्र कृतिदलाच्या आणखी तीन तुकड्या राज्यात पोहोचतील. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी तीन तास परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल व उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. भुल्लरला फाशी दिल्यास राज्यातील परिस्थिती बिघडू शकते, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.