आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा, रामदेव बाबा आणि केजरीवाल अमेरिकेचे दलाल;नक्षलवाद्यांची झारखंडमध्ये पोस्टरबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/जामताडा- बंदी घालण्यात आलेली नक्षली संघटना सीओसी-सीपीआयने (एमएल) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि योगगुरु रामदेव बाबा यांना अमे‍रिकेचे दलाल म्हणून संबोधिले आहे. झारखंडमधील जामताडा जिल्ह्यातील फतेहपूरमध्ये सोमवारी रात्री मोठ्याप्रमाणात पोस्टर चिटकवली आहेत. त्याचबरोबर घराघरात हँडबिलही वितरीत केले आहेत.
फतेहपूर भागातील घरांच्या भींती, दुकाने तसेच सार्वजनिक ठिकाणी ही पोस्टरबाजी करण्‍यात आली आहे. जगभरातील दहशतवादाला अमेरिकानेच जन्म दिला असून अण्णा हजारे, केजरीवाल आणि रामदेव बाबांवर अमेरिकेचे दलाल असल्याचा आरोप करण्‍यात आला आहे.
याशिवाय काही पोस्टर्सवर भाजप आणि कॉंग्रेसला अमेरिकन साम्राज्यवादाचे गुलाम म्हटले आहे. यांच्याविरोधात मोठ्यासंख्येने संघर्ष करण्‍याचे जनतेला आवाहन करण्यात आले आहे.
पोस्टरबाजीतून अमेरिकन साम्राज्यवादाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. जनतेला यांना पाठिंबा देवू नये, यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची तसेच रणनीती ठरविण्यासाठी बैठका घेण्याचेही आवाहन करण्‍यात आले आहे. एका पोस्टरवर 18 डिसेंबर, 2013 तर जुलै 93, 10 डिसेंबर, 08 अशा तारखाही देण्यात आल्या आहे. हे पोस्टर लॅम्पस शाखा फतेहपूर, दुर्गा मंदिराजवळील परिसरात चिटकवण्यात आले आहेत.
ठिकठिकाणी पोस्टर्स झळकल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आनन-फाननमधील सर्व पोस्टर्स्ट आणि हँडबिले जप्त करण्‍यात आली आहे. सकाळी सात वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षलवादी संघटनेतर्फे ठिकठिकाणी पोस्टर चिटकवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नक्षलवादी संघटनेने घराघरात हॅंडबिल वितरीत करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पोस्टर्स...