आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सापडले पोटॅशचे महाभांडार, खाणी तयार करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर - राजस्थानच्या श्रीगंगानगर, हनुमानगड, बिकानेर व चुरू जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोटॅश सापडले आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या ठिकाणी सुमारे २४७६ दशलक्ष टन पोटॅशचे भांडार आहे. याच पार्श्वभमीवर राज्य सरकारने पोटॅशच्या खाणी बनवण्याचे काम सुरू केले आहे.
देशात सध्या सुमारे ७ हजार कोटी रुपये किमतीचे ३५ लाख टन पोटॅश परदेशातून दरवर्षी आयात केले जाते. जिअोलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाने पोटॅशच्या संशोधनासाठी या भागात सुमारे ७० ठिकाणी खड्डे खणले होते. या प्रकल्पास त्यांनी नागौर-श्रीगंगानगर बेसिन असे नाव दिले आहे. यासाठी या भागात दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आले.

त्यानंतरच या भागात २४७६ दशलक्ष टन पोटॅश उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले. पोटॅशचा सर्वाधिक वापर रासायनिक खते बनवण्यासाठी केला जातो. जगातील पोटॅशच्या मात्रेपैकी सुमारे १० टक्के केवळ भारतालाच लागते. कॅनडा तसेच अन्य राष्ट्रांकडून भारत या पोटॅशची आयात करत असतो.

खाणी बनवण्याची तयारी सुरू
उत्खनन विभागाकडून राजस्थानच्या संबंधित चारही जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी खाणी तयार केल्या जात आहेत. या खाणींचा नंतर लिलाव केला जाईल. डिसेंबर २०१५ मध्ये जयपूरमध्ये रिसर्जेंट राजस्थान समारोह होणार आहे. याच दरम्यान खाणींसाठी कंपन्यांची निवड केली जाईल. या लिलावातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे.