आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंची 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत रवानगी, पुरुषार्थ चाचणीत \'पास\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- आश्रमात राहणा-या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या आसाराम बापूंची जोधपूर पोलिसांनी काल तब्बल चार तास कसून चौकशी केली. त्‍यांची 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे. आज (सोमवार) दुपारी त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. त्‍यावेळी न्‍यायालयाबाहेर आसाराम समर्थकांनी गर्दी केली होती. समर्थकांनी नारेबाजी करुन गोंधळ केला. न्‍यायालयीन कोठडी मिळाल्‍यानंतर त्‍यांना केंद्रीय कारागृहात पाठविण्‍यात आले. तिथे त्‍यांच्‍यासाठी एका स्‍वतंत्र खोलीची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्‍याची माहिती आहे.

आसाराम बापुंनी केलेले अनेक दावे वैद्यकीय चाचणीनंतर खोटे ठरले आहेत. आसाराम बापूंची पोटेंसी (पुरुषार्थ) आणि आरोग्‍य चाचणी करण्‍यात आली. या चाचणीचे निष्‍कर्ष त्‍यांच्‍यावरील आरोप बळकट करणारे आहेत. त्‍यांची पुरुषार्थ चाचणी पॉझिटीव्‍ह आली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे, त्‍यांनी आरोप करणा-या मुलीसोबत असल्‍याचे मान्‍य केले आहे. सध्‍या आसाराम बापूंना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्‍यांना पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्‍यान, आसाराम बापूंचा प्रमुख सेवक शिवा याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍यानेच पीडित मुलीला आसाराम यांच्‍या खोलीत नेले होते. याशिवाय छिंदवाडा येथील आश्रमाच्‍या वॉर्डन शिल्‍पी यांनाही अटक करण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे.

आसाराम बापूंनी पोलिसांकडे नोंदविलेल्‍या जबाबामध्‍ये दावा केला होता, की ते लैंगिक संबंध बनविण्‍यास सक्षम नाहीत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर करण्‍यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. मात्र, पुरुषार्थ चाचणीने त्‍यांचा दावा खोडून काढला आहे.

पीडित मुलीसोबत एकांतात असणे हा गुन्‍हा आहे काय? आसाराम बापुंचा सवाल... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...