आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poverty Makes National Boxer Work As Sweeper In Kolkata

पोटाची खळगी भरण्या;साठी राष्ट्री य खेळाडूवर नालेसफाईची वेळ; रात्री देतो बॉक्सिंगचे प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा राऊत. - Divya Marathi
कृष्णा राऊत.
नवी दिल्ली जगात सगऴया गोष्‍टीचं सोंग आणता येतं. पण, पैशांचं नाही. त्‍यामुळेच बॉक्सिंगमध्‍ये राष्‍ट्रीय स्‍पर्धा गाजवणा-या एका खेळाडूवर महापालिकेच्‍या नाल्‍या साफ करण्‍याची वेळ आली आहे. मात्र, खेळाप्रती असलेली त्‍याची निष्‍ठा तसुभरही कमी झाली नाही. परिणामी, रोज रात्री 150 मुलांना बॉक्सिंगचे मोफत प्रशिक्षण तो देतो. ही व्‍यथा आहे हावडा पालिकेत सफाईकामगार असलेल्‍या कृष्णा राऊत (43) यांची.
राऊत हे राष्‍ट्रीय बॉक्सिंग चॅम्‍पीयन. त्‍यांना बालपणापासूनच बॉक्सिंगचे वेड. घरची परिस्थितीती बेताचीच. ते दहा वर्षाचे असतानाच त्‍यांच्‍या वडि‍लांचे निधन झाले. त्‍यामुळे झोपाऴयावाचून झुलण्‍याच्‍या वयात त्‍यांनी मिळेल ते काम करत संसाराचा गाडा हाकण्‍यासाठी आपल्‍या आईला मदत केली. पण, बॉक्सिंगकडेही दुर्लक्ष केले नाही. कुठलेही अधिकृत प्रशिक्षण न घेता ते छोट़या मोठ़या स्‍पर्धा ते खेळत राहिलेत. पुढे त्‍यांनी राष्‍ट्रीय स्‍पर्धेपर्यंत झेप घेतली. विजयावर विजय मिळवले. पदकांनी त्‍यांचे घर भरले. परंतु, त्‍यातून पोट भरत नसल्‍याने त्‍यांनी पालिकेत सफाई कामगार म्‍हणून नोकरी स्‍वीकारली. शिबपूर (जि. हावडा) येथील बागड़ीपा-यामध्‍ये एकाच खोलीत त्‍यांच्‍या पत्‍नी, तीन मुलं आणि एका आजारी भाऊ असे सहा जणांचे कुटुंब राहते. पण, शासनाकडून त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष होत आहे.
आंतराष्‍ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण तेही मोफत
राऊत यांची रोजची कमाई केवळ 232 रुपये. यातून त्‍यांच्‍या कुटुंबांच्‍या प्राथमिक गरजासुद्धा भागत नाहीत. असे असताना त्‍यांनी बॉक्सिंगवरील आपले प्रेम तसुभरही कमी होऊ दिले नाही. ते 150 मुलांना रोज रात्री आंतराष्‍ट्रीय दर्जाचे मोफत बॉक्सिंग प्रशिक्षण देतात.
कृष्‍णा यांनी गाजवलेल्‍या या स्‍पर्धा
कृष्णा राऊत यांनी 1987 मध्‍ये ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप (सूर्यसेन ट्रॉफी) जिंकली, त्‍यानंतर 1992 मध्‍ये रनरअप राहिलेत. 1987 मध्‍ये वेस्ट बंगाल स्टेट ओपन लालचंद रॉय मेमोरियल बॉक्सिंग चॅम्पियनशिपवरही त्‍यांनी आपले नाव कोरले. यातही ते 1985 मध्‍ये रनरअप होते. या शिवाय, त्‍यांच्‍या नावावर वेस्ट बंगाल बॉक्सिंग चॅम्पियनशिप-1985 आणि 1990 चा स्टेट इंटर स्कूल, कॉलेज बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा पुरस्‍कार आहे.