आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा रेल्वेमंत्रीच चालत्या रेल्वेतून उडी मारतात... वाचा कुठे घडली ही घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई लोकलने रेल्वे मंत्री प्रभुंचा प्रवास (फाइल फोटो) - Divya Marathi
मुंबई लोकलने रेल्वे मंत्री प्रभुंचा प्रवास (फाइल फोटो)
मेरठ - चालत्या रेल्वेतून उतरु नये असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने नेहमी सांगितले जाते पण जेव्हा रेल्वे मंत्री चालत्या रेल्वेतून उडी मारतात तेव्हा... होय, येथील मेरठ रेल्वेस्टेशनवर रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंनी चालत्या रेल्वेतून उडी मारली आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते, रेल्वेचे अधिकारी पाहातच राहिले.

झाले असे, की गाजियाबाद-मेरठ-सहारनपूर रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम झाले असून त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रभु मेरठ येथे आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशनवर झालेली गर्दी त्यांनी लांबूनच पाहिली आणि गाडी प्लॅटफॉर्मवर आल्याबरोबर या सत्कार सोहळ्यापासून दूर पळण्यासाठी त्यांनी चालत्या गाडीतून उडी घेतली. वास्तविक तेव्हा रेल्वे धीम्यागतीने चालत होती.
चालत्या रेल्वेतून उडी मारुन प्लॅटफॉर्मवरील स्वागत सोहळा टाळून प्रभु थेट मंचावर पोहोचले. मात्र कार्यकर्तेही माघार घेणारे नव्हते त्यांनी प्रभुंना मंचावर गाठले आणि गाजियाबाद-मेरठ-सहारनपूरचे विद्युतीकरण केल्याबद्दल प्रभुंचे अभिनंदन केले.

सिटी स्टेशन येथे रेल्वे मंत्र्यांनी विद्युतीकरणाचे लोकार्पण केले. त्यासोबतच एसक्लेटर आणि लिफ्टचे भुमीपूजन प्रभुंच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात जेवढे काम झाले नाही तेवढे गेल्या दोन वर्षांमध्ये झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्याला एनडीए सरकारीच प्राथमिकता असल्याचे प्रभुंनी सांगितले.
रेल्वेने दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात 4500 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर इस्टर्न फ्रेट कॉरिडॉरसाठी 8500 कोटी रुपये कॅबिनेटने मंजूर केले असल्याचे प्रभुंनी सांगितले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...