आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रद्युम्न हत्याकांडप्रकरणी ‘रेयान’चा माळी ताब्यात; आणखी अटक होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील दुसरीचा विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर याच्या हत्याप्रकरणी गुडगाव पोलिसांनी शाळेचा माळी हरपाल सिंह याला बुधवारी ताब्यात घेतले. तो या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे. याप्रकरणी आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.  

एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी अशोककुमार यांनी सांगितले की, महत्त्वाचा ठरू शकतो आणि माहिती देऊ शकतो असा एकही पुरावा मागे राहू नये अशी एसआयटीची इच्छा आहे. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. आम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. जे कोणी संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत त्या सर्वांची चौकशी केली जात आहे.  एसआयटीच्या पथकांनी बुधवारी या शाळेत तपास केला तर सीबीएसईच्या पथकानेही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची तपासणी केली. एसआयटीने १७ जणांची चौकशी केली आहे. 
 
पिंटो कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
उच्च न्यायालयाने रेयान इंटरनॅशनल ग्रूपचे सीईओ रेयान पिंटो आणि त्यांचे पालक ऑगस्टिन पिंटो व ग्रेस पिंटो यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज गुरुवारी फेटाळून लावला. मात्र, न्यायालयाने त्यांना अपील दाखल करण्यासाठी एक दिवसाचा दिलासा दिला. त्यांना शुक्रवार सायंकाळपर्यंत अटक करता येणार नाही. न्यायमूर्ती अजेय गडकरी यांनी त्यांना आपला पासपोर्ट मुंबई पोलिस आयुक्तांकडे जमा करण्यास सांगितले आहे. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी पिंटोंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता.
बातम्या आणखी आहेत...