आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे HRD मंत्री जावडेकरांनी घेतली स्मृती इराणीची भेट, म्हणाले- मी त्यांचा सल्ला घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सकाळी स्मृती इराणीं यांची त्यांच्या राहात्या घरी भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांना सामोरे आलेल्या जावडेकर यांनी स्मृती इराणी यांच्या कामाला पुढे वाढविणार असल्याचे म्हटले. ते म्हणाले, 'आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मी त्यांचा सल्ला घेतला.' मंगळवारी झालेल्या कॅबिनेट विस्तारामध्ये जावडेकर यांना प्रमोशन मिळाले असून स्मृती यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून ते जावडेकरांना देण्यात आले.

- जावडेकरांच्या भेटीनंतर स्मृती इराणींन ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, 'मनुष्यबळ विकास मंत्रालयात दोन वर्षे काम केले. अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक निर्णय घेतले. आता प्रकाशजी त्याला सांभाळतील.'
- इराणींनी आणखी एक मंत्री संतोष गंगवार यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा व्यक्त केली आता वस्त्रोद्योग खाते चांगल्या प्रकारे काम करेल.
स्‍मृती यांच्‍या कामकाजावर नाराजी..
मोदी सरकारमध्‍ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्‍या मंत्री स्‍मृती इराणी याच्‍याकडे आता वस्त्रोद्योग खाते सोपवण्‍यात आले आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार भाजपाध्‍यक्ष अमित शाह हे इराणी यांच्‍या कामकाजावर समाधानी नव्‍हते. शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत होते की, स्मृतीसंदर्भातील वादांमुळे त्‍यांच्‍या कामावर परिणाम होत आहे. बुधवारी स्मृती यांनी त्‍यांचे नवीन ऑफिस जॉइन केले. त्‍यांचे खाते बदलण्‍यात आल्‍याने माध्‍यमांशी बोलताना त्‍या म्हणाल्‍या की, लोक काही तरी बोलणारच लोकांना बोलण्‍याचे काम असतेच.
19 नवे राज्य मंत्री- कोणाला काय मिळाले
1. अर्जुन राम मेघवाल : अर्थ, कॉर्पोरेट अफेयर्स
2. सी.आर. चौधरी : कन्झ्यूमर अफेयर्स, अन्न आणि नागरी पुरवठा
3. पी.पी. चौधरी : लॉ अँड जस्टिस, इलेक्ट्रॉनिक अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
4. विजय गोयल : स्पोर्ट्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा पुनरुद्धार
5. अनुप्रिया पटेल : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
5. कृष्णा राज : महिला आणि बालविकास
7. महेंद्रनाथ पांडे : मनुष्यबळ विकास
8. अजय टमटा : वस्त्रोद्योग
9. अनिल माधव दवे : पर्यावरण
10. फग्गन सिंह कुलस्ते : आरोग्य आणि कुटुंब कल्याण
11. एम.जे. अकबर : परराष्ट्र व्यवहार
12. डॉ. सुभाष भामरे : संरक्षण
13. रामदास आठवले : सामाजिक न्याय
14. जसवंतसिंह भाभोर : आदिवासी विकास
15. मनसुख मनदाविया : रस्ते परिवहन आणि महामार्ग
16. पुरुषोत्तम रूपाला : कृषी आणि पंचायती राज
17. राजेन गोहेन : रेल्वे
18. राजेश जिगजिगानी: पेय जल आणि मलनिस्सारण
19. एस.एस. अहलूवालिया : कृषी
बातम्या आणखी आहेत...