आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pranab Mukherjee Laud Raghuram Rajan Says Give Right Way For Bank Situation Reforms

राष्ट्रपतींनी केले निवृत्त गव्हर्नरांचे कौतुक; राजन यांनी बँकांचा ताळेबंद स्वच्छ ठेवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच निवृत्त झालेले रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांचे कौतुक केले आहे. बँकांची बॅलेन्स शीट स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने राजन यांनी महत्त्वाचे पाऊल उचलल्याने एनपीएत वाढ झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.

एका बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आपण बँकींग प्रणालीमध्ये एनपीएबद्दल ऐकतो. निश्चितपणाने हा चिंतेचा विषय आहे. नुकतेच निवृत्त झालेल्या राजन यांनी बँकींग प्रणालीमध्ये सुधारणा घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक बँकांचा एनपीए मार्च २०१५ मध्ये १०.९० टक्के होता. तो मार्च २०१६ मध्ये वाढून ११.४० टक्के झाला आहे.

एनपीएचीवास्तविक स्थिती सांगितली : रघुरामराजन यांनी सप्टेंबरला रिर्झव्ह बँकेचे गर्व्हनर म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बँकांनी एनपीएची वास्तविक स्थिती सांगण्यास भाग पाडले. मुखर्जी म्हणाले, विदेशात एका खासगी कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर संकट निर्माण केले. त्यामुळे यातून जग सावरू शकलेले नाही. वास्तविक पाहता भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकींग प्रणालीने चांगले प्रदर्शन केले आहे.

बँकांचा नफा घटला
राष्ट्रपती म्हणाले की, सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा मार्च २०१५ मध्ये ७९,४६५ कोटी रुपयांनी घटला. मार्च २०१६ मध्ये ३२,२८५ कोटी रुपये झाला. वाढणाऱ्या एनपीएमुळे बँकांची स्थिती उत्तम राहत नाही. तोच पैसा लोकांना कर्ज देण्यासाठी उपलब्ध असणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...