आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Bhushan Met Achyutanand For Guiding AAP

प्रशांत भूषण-अच्युतानंदन भेट;आपसाठी मार्गदर्शन मागितले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम - आम आदमी पार्टीचे नेते प्रशांत भूषण यांनी सोमवारी माकपचे ज्येष्ठ नेते व केरळमधील विरोधी पक्षनेते व्ही. एस. अच्युतानंदन यांची भेट घेऊन मार्गदर्शन मागितले. भेटीमागे अच्युतानंदन यांना पक्षात निमंत्रण देण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे भूषण यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या पक्षाच्या सरकारसाठी अच्युतानंदन यांचे मार्गदर्शन मागितले. त्यांना आमच्या पक्षाचे निमंत्रण देण्यात आले नाही, असे भूषण यांनी अच्युतानंदन यांच्या भेटीनंतर सांगितले. ‘आप’समोरील उद्दिष्ट आणि हेतू त्यांच्यासमोर मांडला. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करून सत्तेच्या आराखड्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. आपला पक्ष या बाजूने उभा आहे. या विचाराच्या लोकांनी त्यासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे भूषण यांनी अच्युतानंदन यांना सांगितले. सध्याची राजकीय स्थिती आणि अच्युतानंदन यांच्यावर सार्वजनिक जीवनात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा करण्यात आल्याचे अच्युतानंदन यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले. कुडानकुलम अणु प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी भूषण यांनी गेल्यावर्षी अच्युतानंदन यांची भेट घेतली होती.