आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : कांग्रेसच्या वरिष्ठांनी माझे ऐकले नसल्याने झाला मोठा पराभव : प्रशांत किशोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशांत किशोर म्हणाले की मला उत्तर प्रदेशात मोकळपणाने काम करू दिले नाही. (फाइल) - Divya Marathi
प्रशांत किशोर म्हणाले की मला उत्तर प्रदेशात मोकळपणाने काम करू दिले नाही. (फाइल)
लखनऊ - काँग्रेसचे इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशात पक्षाच्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवासाठी सपा बरोबरची आघाडी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांचे नाव न गेता ते म्हणाले की, युपीमध्ये टॉप मॅनेजमेंटकडून मला मोकळेपणाने काम करू दिले नाही. त्यामुळेच हे घडले आमचे प्रतिनिधी रोहिताश्व कृष्ण मिश्रा यांच्याशी चर्चा करताना प्रशांत यांनी युपीबाबत काँग्रेस नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशांत म्हणाले, जोपर्यंत मी खाट पे चर्चा घेत होतो, तोपर्यंत सर्वकाही योग्य चालले होते. माझे ऐकलेही जात होते. त्यानंतर वरिष्ठांनी माझे ऐकणे नाही. मोकळेपणाने काम करू दिले नाही. माझी स्ट्रॅटेजी फॉलो केली असती तर काँग्रेसची ही अवस्था झालीच नसती. पंजाबबाबत काँग्रेस लीडर्स माझ्या स्ट्रॅटेजीवर चालले. त्याठिकाणी आम्हाला बहुमत मिळाले. 

माझ्याकडे बोट दाखवणे सोपे, उशीरा केलेल्या आघाडीने झाले नुकसान 
- प्रशांत यांच्या मते काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या पराभवामागचे कारण काळ हेच आहे. माझ्याकडे बोट दाखवणे सोपे आहे. तरी या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारेल. 
- काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि त्यांच्याच सर्वकाही आलबेल नसल्याचे प्रशांत यांनी स्पष्ट केले आहे. युपी काँग्रेस चीफ राज बब्बर यांच्याशीही त्यांचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले जाते. मीडियामध्ये याबाबत नेहमी वृत्त येत होते. पण प्रशांत यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. 
 
 प्रत्येक गोष्टीला उशीर झाला 
-  प्रशांत म्हणाले, आधी माझे काही ऐकले नाही, त्यात आघाडीला फार उशीर झाला. प्रत्येक गोष्टीला उशीर होत गेला. त्यानंतर कौटुंबीक कलहामुळे आमचे नुकसान झाले. 
- पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचे काम जवळपास पूर्ण झाले, त्यावेळी काँग्रेस आणि सपा यांच्यात आघाडी झाली. जेव्हा पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मतदार आणि उमेदवार यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. अनेक जागा तर अशा होत्या ज्याठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते. 
- त्यामुळे झालेले नुकसान म्हणजे, मतदार आणि दोन्ही नेते कोणालाही काहीही कळत नव्हते. भाजपला त्यामुळे फायदा झाला. त्याचे कारण म्हणजे त्यांचा रोडमॅप अगदी स्पष्ट होता. 
- काँग्रेसला 2017 मध्ये केवळ 7 जागा मिळाल्या आहेत. ही त्यांची स्वातंत्र्यानंतरची आजवरची सर्वात खराब कामगिरी आहे. यापेक्षा कमी जागा त्यांना कधीही मिळाल्या नव्हत्या. मात्र प्रशांत यांच्या वक्तव्यावर अद्याप काँग्रेसने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
प्रियंकाबाबत काय म्हणाले किशोर...
प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशात प्रचार करावा असे प्रशांत किशोर यांचे मत होते. याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, हे खरं आहे. पण जे झाले ते झाले. निवडणुकीत काँग्रेसने तीनवेळा प्रियंका गांधींच कार्यक्रम बदलला. आधी सांगण्यात आले की, प्रियंका उत्तर प्रदेशात पूर्ण प्रचार करतील. त्यानंतर त्या केवळ अमेठी आणि रायबरेलीत प्रचार करतील असे सांगितले. पण प्रत्यक्षात त्यांची फक्त एक सभा झाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...