आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची चहावाला स्ट्रॅटेजी अखिलेश यांच्यासाठी वापरणार प्रशांत किशोर, वाराणसी असेल टार्गेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी मतदारसंघ हा सपा-काँग्रेसच्या टार्गेटवर राहाणार आहे. - Divya Marathi
वाराणसी मतदारसंघ हा सपा-काँग्रेसच्या टार्गेटवर राहाणार आहे.
लखनऊ - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी स्वतःला चहा विक्रेता सांगून सर्वसामान्यांना आपल्या बाजूने करण्यात यशस्वी झाले होते. अशीच खेळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजावादी पक्ष आणि काँग्रेससाठी प्रचाराची रणनीती तयार करणारे रणनीतीकार (स्ट्रॅटिजिस्ट) प्रशांत किशोर यांनी तयार केली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर हेच मोदींचे स्ट्रॅटिजिस्ट होते. बिहार विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी मोदी आणि भाजपची साथ सोडली आहे. 
 
PM मोदींवर वाराणसीत जोरदार हल्ल्याची तयारी
अखिलेश यादव यांचे ब्रँडिंग करण्यासाठी अखिलेश यांचे नाव असलेले टी-शर्ट चहावाले परिधान करणार आहेत. पूर्वांचलमध्ये सपा-काँग्रेस आघाडीला विजयी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी रणनीती तयार केली आहे. त्यानूसार वाराणसी आणि गोरखपूरमध्ये प्रचाराचे वेगवेगळे फंडे आजमावले जाणार आहेत. वाराणसी हा मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे येथे मोदींनाच सर्वाधिक टार्गेट करुन भाजपला बॅकफूट आणण्याचा प्रयत्न राहाणार आहे. 
- मीडिया रिपोर्टसनुसार, उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात सपा आणि काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे.
- गोरखपूरमध्ये आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे दाखवण्यासाठी सर्व नेते येथे तळ ठोकून राहाणार आहेत.
- सातव्या टप्प्यात पूर्वांचलमध्ये भाजप आणि बसपाची नाकेबंदी करण्यासाठी वाराणसीला टार्गेट केले जाईल.
- पंतप्रधानांच्या या मतदारसंघात त्यांनाच टार्गेट करून भाजपला एकाच ठिकाणी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे. 
- त्यासोबतच प्रचाराचे वेगवेगळे मार्ग चोखळले जातील. त्यापैकी एक आहे घरोघर जाऊन अखिलेश यांचे पत्र मतदारांच्या हातात देणे.
- अखिलेश यादव हेच चर्चेत राहावे यासाठी चहाविक्रेत्यांना अखिलेश यांचे नाव असलेले टी-शर्ट दिले जाणार आहे. 
- हे टी-शर्ट परिधान करुनच चहावाले दिवसभर लोकांसमोर जातील अशी यामागे योजना आहे. 
- टी-शर्टवर अखिलेश यांच्या नावासह आघाडीचे घोषवाक्य आणि निवडणूकीची घोषणा राहील.
 
प्रत्येक मोबाइलवर 'दर्द-ए-बनारस' वाजणार 
- वाराणसीवर लक्षकेंद्रीत करुन प्रचाराची रणनीती ठरवली जात आहे. यासाठी एक व्हिडिओ तयार केला गेला आहे. त्याचे टायटल आहे 'दर्द-ए-बनारस'.
- या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींनी वाराणसीच्या लोकांना कोणकोणती आश्वासने दिली होती, आणि आता सध्या तिथे काय स्थिती आहे ती दाखवली जाणार आहे. त्यासोबतच पीएम काय-काय म्हणाले होते आणि आता काय परिस्थिती आहे. हे देखील सांगितले जाणार आहे. 
- व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक भलामोठा कॉन्टॅक्ट डेटा तयार केला गेला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाइलवर पोहोचेल याचीही दक्षता घेतली जात आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...