आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Kishore Now Advisor To Nitish Kumar Officially

प्रशांत किशोर CM नितीशकुमारांचे सल्लागार, मिळाला कॅबिनेट दर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि प्रशांत किशोर - Divya Marathi
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि प्रशांत किशोर
पाटणा - बिहार विधानसभेत जनता दल संयुक्त (जेडीयू)च्या प्रचाराचे नियोजनकार प्रशांत किशोर यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सल्लागार नेमण्यात आले आहे. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला असून याचा आदेश गुरुवारी काढण्यात आला.

आता काय काम करणार प्रशांत किशोर
- बिहार सरकारच्या योजनांची अमंलबजावणी करण्यात नितीशकुमारांना सल्ला देणार.
- बिहार विधानसभा विजयानंतर अशी चर्चा होती, की त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार. मात्र सुरुवातीला त्यांनी ही जाबाबदारी स्विकारण्यास नकार दिला होता.

विधानसभा निवडणुकीत होती महत्त्वाची भूमिका
- बिहार विधानसभेदरम्यान नितीशकुमार आणि त्यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती ठरविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

कोण आहे प्रशांत किशोर
प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी निवडणूक प्रचार आणि स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटचे काम करतात. भारतासाठी हे नवीन आहे, मात्र अनेक देशांमध्ये अशा पद्धतीने निवडणुकीत याचा वापर होत आला आहे. 37 वर्षांचे प्रशांत किशोर याआधी संयुक्त राष्ट्रात जॉब करत होते. भारतात त्यांना '3 डी रॅली' आणि डिजिटल कँपनेसाठी ओळखले जाते. त्यांची 300 जणांची टीम आहे. या टीममध्ये आयआयटी आणि आयआयएममधून पासआऊट झालेले प्रोफेशनल्स आहे.
पुढील स्लाइडमध्ये, मोदींसाठी केले होते काम