आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Suicide Case Bhaskar Special Report

प्रत्यूषाचे पालक म्‍हणाले, \'राहुलने दिली होती धमकी\', वाचा आईने अजून काय सांगितले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर/ मुंबई - टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जीचे मृत्यू प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. तिचे सहकारीही नित्यनवीन खुलासे करत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्युषाच्या मनात काय सुरू होते हे आम्ही थेट तिच्या कुटुंबीयांकडूनच जाणून घेतले.
टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार प्रत्युषा बॅनर्जीला मुंबईतील झगमगाटातील हायप्रोफाइल आयुष्याचा कंटाळा आला होता. तिला हे सर्व सोडून आपल्या मूळ गावच्या घरी परत जावेसे वाटत होते. "मालिका सोडून मी घरी परत आले तर तू मला सोबत ठेवशील काय?' असा प्रश्न प्रत्युषाने मृत्यूच्या दोन दिवस आधी २७ मार्च रोजी आईला फोनवर विचारला होता. त्यावर आई म्हणाली, "प्रत्युषा, तू माझी मुलगी आहेस. मी तुला आयुष्यभर सोबत ठेवेन.'

प्रत्युषाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे चौकशीनंतरच उघडकीस येईल, परंतु ती आत्महत्या करू शकत नाही, असा कुटुंबीयांचा दावा आहे. तिचे काका किंशुक मुखर्जी यांच्या मते, ती तीन महिन्यांपासून खूप त्रस्त होती. राहुल राजने तिला जमशेदपूरला जाण्यास मनाई तर केली होतीच, शिवाय तिने कोणत्याही नातेवाइकास मुंबईला बोलावू नये, अशी ताकीदही दिली होती. प्रत्युषाला कुटुंबीयांपासून दूर ठेवण्याचा राहुलचा कट होता. त्याने तिचे क्रेडिट व एटीएम कार्डही स्वत:कडे घेतले होते. प्रत्युषाची काकू राजश्री यांच्या मते, प्रत्युषा मुंबईत राहणारे टीव्ही मालिकांमधील कलाकार लकी नरुलाला भाऊ मानते. परंतु राहुलने प्रत्युषाला त्याच्यापासून दूर केले. तिला इतका त्रास दिला की तिचा शेवटी नाइलाजच होता. परंतु आपल्या करिअरबाबत ती जागरूक होती.

प्रत्युषाच्या वर्तणुकीला उजाळा देताना काका किंशुक सांगतात, अभिनय करत असतानाही कुणाला आपला त्रास होऊ नये असे प्रत्युषाला नेहमी वाटायचे. एका मालिकेत तिला चेटकिणीची भूमिका मिळाली होती. अर्थातच ही नकारात्मक भूमिका असल्याने एका बालकावर त्यात चाकूचा वार करायचा होता. त्यावर ती फोनवरून मला म्हणाली की, अशी भूमिका मला करायची नाही. लोक मला आनंदीच्या रूपात पाहू इच्छितात. तेव्हा मी तिला अभिनय आणि आयुष्यातील फरक समजावून सांगितला. ज्याच्या मनात असे विचार असतील तो अशा प्रकारे मरू शकत नाही, असे किंशुक यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले, राहुल तिला कुटुंबीयांपासून वेगळे करत होता. याचाच अर्थ तिला मारण्याचा त्याचा कट होता. प्रत्युषा आत्महत्या करूच शकत नाही, असा प्रत्युषाचे आईवडील आणि नातेवाइकांचा दावा आहे. मुलीला न्याय मिळावा यासाठी आई शोभा बॅनर्जी आणि वडील शंकर बॅनर्जी यांनी मुंबईत तळ ठोकला आहे.

अभिनयाच्या प्रेमापोटी प्रत्युषाने जमशेदपूरहून मुंबई गाठली होती. मला टीव्हीत जायचे आहे, असे म्हणत ती बालपणी टीव्हीत घुसायची. वयाबरोबरच तिचे आकर्षणही वाढतच गेले. तिची आवड पाहून वडिलांनी तिला नाटकांसोबतच फॅशन शोमध्येही पाठवायला सुरुवात केली. रंगमंच आणि रॅम्पने प्रत्युषाची अभिनयकला आणि आत्मविश्वास वाढवला. सोबतच केरला पब्लिक स्कूल कदमामधून तिचे शिक्षणही सुरू होते. जमशेदपूरच्या सोनारीत झालेल्या एका फॅशन शोमध्ये प्रत्युषा विजेती ठरली तेव्हा वडिलांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
नवरात्रोत्सवावेळी होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत तिने असंख्य पुरस्कार मिळवले. २०१० या वर्षाने प्रत्युषाचे आयुष्यच बदलून टाकले. वाहिनीतर्फे "बालिका वधू' मालिकेसाठी देशभरातील मुलींचे ऑडिशन सुरू होते. प्रत्युषाला ही संधी मिळाली आणि बालपणीचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.

राजश्री यांच्या मते, रांचीजवळील नामकुम भागात राहुल राज सिंहचे वडिलोपार्जित घर आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रत्युषा या ठिकाणी राहुलच्या आईवडिलांना भेटण्यासही आली होती. परंतु राहुलचे आधीच लग्न झालेले होते हे तिला माहीतच नव्हते. राहुल विवाहित असल्याचे आम्हाला कुणालाच माहीत नव्हते, असाही राजश्री यांचा दावा आहे.

आठवण : काही दिवसांपूर्वी प्रत्युषा जमशेदपूर येथे आपल्या घरी आली होती तेव्हा वडील शंकर बॅनर्जी यांना म्हणाली होती की, ज्या घरात आपले कुटुंब राहते तो फ्लॅट मम्मी-पपांना भेट देऊ इच्छित आहे.

लहानपणापासून कणखर होती
"प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी यांनी भास्करला सांगितले की, प्रत्युषा आपले करिअर आणि कुटुंबाबाबत खूप आनंदी होती. तिच्या आयुष्याकडे पाहिल्यावर ती आत्महत्या करेल असे कधी वाटले नव्हते. तिच्याकडे भविष्यातील ऑफर्सची कोणतीही कमतरता नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या केली नाही, असा मी दावा करू शकतो. तिची हत्या करण्यात आली.

प्रत्युषाचा मावसभाऊ सुपल याचीही अशीच धारणा आहे. ते म्हणाले की, लहानपणापासूनच प्रत्युषा खूप कणखर होती. आर्थिक विवंचनेसह अनेक संकटांना ती सामोरी गेली होती. ितने प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. त्यामु‌ळे अशा कोणत्याही कारणामुळे प्रत्युषा आत्महत्या करेल, असे वाटत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषाचे कुटुंबीयांसोबतचे आणि बालपणीचे फोटो...