आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण तोगडियांना बंगळुरू विमानतळावर अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्यावर प्रतिबंध असतानाही ते दाखल झाल्यानंतर त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली. विहिंपच्या हिंदू विराट समाजोत्सवात सहभागी होण्यासाठी ते आले होते. रविवारी ते मार्गदर्शन करतील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये त्यांना येण्यास मनाई करण्यात आली होती. शहर पोलिस आयुक्त एमएन रेड्डी यांनी तीन फेब्रुवारी रोजी यासंबंधी आदेश जारी केले होते.
त्यानुसार ५ फेब्रुवारीपासून आठवडाभर तोगडिया यांनी शहरात येऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्याला आक्षेप घेणारी विहिंपची याचिका उच्च न्यायालयाने मात्र फेटाळून लावली होती.