आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिंपचे अशोक सिंघल, प्रवीण तोगडि‍यांसह अनेक कार्यकर्त्‍यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्‍या- विश्‍व हिंदू परिषदेतर्फे आयोजित 84 कोसी परिक्रमेत सहभागी होण्‍यासाठी निघालेले माजी खासदार राम विलास वेदांती यांच्‍यासह प्रवीण तोगडिया यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांना अयोध्‍येत दाखल होताच ताब्‍यात घेण्‍यात आले. तोगडिया अयोध्‍येत शनिवारी दाखल झाले होते. त्‍यांच्‍या आगमनामुळे अयोध्‍या प्रशासनाची झोप उडाली होती. तोगडिया यांच्‍यापाठोपाठ अशोक सिंघल आणि विहिंपच्‍या बड्या नेत्‍यांनाही अटक करण्‍यात आली आहे. सिंघल यांनी विमानाने लखनौ गाठले. मात्र, त्‍यांना विमानतळावरच अटक करण्‍यात आली. एकीकडे विहिंपच्‍या नेत्‍यांचे अटकसत्र सुरु असतानाच 84 कोसी परिक्रमेची सांकेतिक सुरुवात झाल्‍याची घोषणा विहिंपने केली आहे. सकाळी 10 वाजता शरयू पूजन केल्‍यानंतर यात्रा सुरु झाल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. विहिंपने आता परिक्रमेची योजना बदलली आहे. परिक्रमा मखौडा येथून सुरु होईल. तणावाची परिस्थिती पाहता विहिंपची वेबसाईट बंद करण्‍यात आली असून सोशल मीडियामध्‍येही विहिंपचे पेजेस ब्‍लॉक करण्‍यात आले आहेत.

माजी खासदार वेदांती यांना अतिशय नाट्यमयरित्‍या अटक करण्‍यात आली. ते शरयू नदीजवळ एक ब्‍लँकेट पांघरुन बसले होते. पोलिसांना संशय आल्‍यावर त्‍यांनी विचारणा केली. कोणतेही प्रत्‍युत्तर न मिळाल्‍याने पोलिसांनी त्‍यांना अटक केली. अटक केल्‍यानंतर ब्‍लँकेट काढल्‍यानंतर ते वेदांती असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.