आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मुलींना मांडीवर घेऊन प्रेग्नंट पत्नीने लावली आग, आता कोणासाठी जगू म्हणत पतीचा आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेग्नंट विवाहितेने 3 मुलींना मांडीवर घेऊन जाळून घेतले. - Divya Marathi
प्रेग्नंट विवाहितेने 3 मुलींना मांडीवर घेऊन जाळून घेतले.
भोपाळ - एमपीच्या नोहटा परिसरात शुक्रवारी एका महिलेने तीन मुलींना मांडीवर बसवून केरोसीन टाकून आग लावली, दोन मुलींचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर रूपाने जळालेल्या आईला जबलपूरला रेफर करण्यात आले आहे. संध्याकाळी तिचाही मृत्यू झाला.
 
का उचलले हे पाऊल?
- महिलेला अगोदर 3 मुली होत्या आणि ती 6 महिन्यांची प्रेग्नंट होती.
- घरच्यांनी नुकतीच तिची सोनोग्राफीही केली होती, या वेळी मुलगा होईल की नाही, हे बहुतेक तिच्या सासू-सासऱ्यांना कळाले होते. तिला ते जाता-येता बोल लावू लागले होते. 
-म्हणून निराशन होऊन तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.
 
15 लिटर केरोसिन टाकून लावली आग
- एसपी विवेक अग्रवाल म्हणाले की, मौसीपुराच्या 30 वर्षीय राणीचा पती नेपाल सिंह यांनी सकाळी 9 वाजता सासू गुड्डीबाईला राणीच्या पोटात वेदनात होत असल्याचे सांगून त्यांना औषध आणण्यासाठी पाठवले. आणि स्वत: शेतात गेला. राणीने यानंतर दार बंद करून मोठी मुलगी मुस्कान 7, मधली मुलगी मानसी 3 आणि दीड वर्षांची तुलसी यांना आपल्या मांडीवर बसवले, आणि चारही बाजूंनी तब्बल 15 लिटर केरोसीन टाकून आग लावली.
- आगीत होरपळल्याने मानसी आणि तुलसीचा जागीच मृत्यू झाला. तर मुस्कानचा श्वास सुरू होता.
- तिला लगेच सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथे पोहोचेपर्यंत ती मृत झाली होती. यानंतर मुलींची आई राणीचाही मृत्यू झाला.

बापाला म्हणाली मुलगी, बॅगेत ठेवलेल्या डायरीत लिहिले आहे सर्वकाही
- सरकारी रुग्णालयात दिलेल्या जबाबात जळीत राणी लोधी म्हणाली की, तिच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या होत्या, म्हणूनच मी हे पाऊल उचलले.
- या घटनेवेळी तिचा पती नेपाल सिंह शेतात गेलेला होता. राणीचे वडील उम्मेद सिंह म्हणाले की, रुग्णालयात तिच्याशी बोलणे झाले आहे, ती म्हणतेय की मी काहीच सांगणार नाही.
- घरात ठेवलेल्या बॅगेतील डायरीत तिने सर्वकाही लिहिलेले आहे.
 
बॅगेत आढळली नाही डायरी
- एसपी म्हणाले की, महिलेची सोनोग्राफी झाली होती का याची अंगणवाडी कार्यकर्तीकडे चौकशी केली जात आहे.
- यावरून कळते की महिला गर्भवती होती. परंतु बॅगेत कोणतीही डायरी आढळलेली नाही.
- आता एफएसएल आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी आहेत. ते परतल्यावरच सर्व बाबी स्पष्ट होतील.
 
समोर आले नवऱ्याचे दु:ख
- घटनास्थळी महिलेचा पती नेपाल सिंहने रडत-रडतच सांगितले की, गर्भात चौथी मुलगीच असल्याच्या संशयाने राणीला बोलणे खावे लागत होते, यामुळे ती त्रस्त झाली होती.
- याच कारणामुळे तिने मुलींसह स्वत:ला संपवले. तिने असे करायचे नव्हते, मी आता कोणाकडे पाहून जगू? असे म्हणत नवरा ढसढसा रडत होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या दुर्दैवी घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...