बंगळुरू- नऊ महिन्यांची गर्भवती येल्लावाने पुरामुळे दुथडी भरून वाहणार्या नदीत उडी घेतली. आपल्या बाळाचा जन्म रुग्णालयात व्हावा, अशी 22 वर्षीय येल्लावाची इच्छा आहे. तिच्या गावात तशी सुविधा नाही. तिला पोहणेही येत नव्हते. तरीही दीड तास पोहून ती किनार्यावर पोहोचली. ही घटना उत्तर कर्नाटकातील यादगिर जिल्ह्यातील सुरापूर तालुक्यातील नीलकातरायणागडे येथील आहे.
उत्तर कर्नाटकातून वाहणार्या कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यात येल्लावाचा प्रसुतकाळ जवळ आला होता. नीलकातरायणागडे या गावाच्या जवळपासच्या परिसरात एकही रुग्णालय नाही. चार किलोमीटर अंतरावर रुग्णालय होते. परंतु त्यासाठी नदी पार करावी लागणार होती. त्यात नदीला पूर आल्याने एकही नाविक नौका काढण्यास तयार नव्हता.
अखेर येल्लावाने अशा परिस्थितीत स्वत: पोहोत जाऊन रुग्णालयात जाण्याची हिंमत दाखवली. तिच्या उदरात मुलगा होता. बाळाला सुरक्षित जन्म देण्याची येल्लावाची इच्छा होती. येल्लावाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहुन तिच्या वडिलांनी तिला नदी उडी घ्यायला सांगितली. येल्लावाच्या भावाने सुरक्षेसाठी तिच्या पाठीवर सुकलेले भोपळे बांधले. भाऊ येल्लावाच्या पुढे तर वडील तिच्या मागे, अशा पद्धतीने तिघे तब्बल 90 मिनिटे पोहून कृष्णा नदी पार करून रुग्णालयात पोहोचले. नंतर काही वेळातच येल्लावाने गोंडस मुलाला जन्म दिला. येल्लावा आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गर्भावस्थेत कृष्णाई पार करणारी येल्लावा काय म्हणाली...