आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preparation Of E voting In The Next Elections: Rawat

भारतात लवकरच ई-वोटिंगची सुविधा, केंद्रीय निवडणूक आयुक्‍तांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओ. पी. रावत - Divya Marathi
ओ. पी. रावत
रायपूर - मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्राबाहेर लागलेल्‍या लांबच लांब रांगा आपण प्रत्‍येक निवडणुकीत पाहतो. मात्र, मतदानासाठी बूथवर जाण्‍याऐवजी आपल्‍या घरूनच स्‍मार्ट फोन, संगणण, लॅपटॉप यांच्‍यावरून ई-मतदानचा हक्‍क बजावता आला तर यंत्रणेवरील ताण कमी होईल, याचाच विचार करून केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच 'ई-वोटिंग'ची सुविधा देणार आहे. सोबतच पोस्टल बॅलेटच्‍या ऐवजी इलेक्ट्रानिक -पोस्टल बॅलेटची सुविधासुद्धा पाच राज्‍यांत आगामी विधानसभा निवडणुकीपासून देणार आहे. या बाबत निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी रायपूरमध्‍ये 'दैनिक भास्कर'ला माहिती दिली.

रावत म्‍हणाले, मंत्री गटाच्‍या मार्गदर्शनात देशात ई व्‍होटिंग सुविधा सुरू करण्‍याची तयारी आम्‍ही केली आहे.
ई-पोस्टल बॅलेटही सुरू होणार
आजघडीला 10 ते 15 टक्‍के मतदाराच पोस्टल बॅलेटचा वापर करतात. मात्र, आता पाच राज्‍यांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून प्रायोगिक तत्‍त्‍वावर ई पोस्टल बॅलेट सुविधा दिली जाणार आहे. त्‍यामुळे मतदानाच्‍या टक्‍केवारी वाढ होईल, अशी माहितीही रावत यांनी दिली. ने वाले हैं।