आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preserve Youth Dalit Death Body, Madras High Court Ordered Government

दलित तरुणाचा मृतदेह जतन करा, मद्रास उच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - एका दलित तरुणाचा मृतदेह रेल्वेस्थानकाजवळ सापडल्याने प्रकरण गूढ झाले आहे. या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला त्याचा मृतदेह मंगळवारपर्यंत जतन करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती व्ही. धनापालन व सी. टी. सेलव्हम यांच्या पीठाने हा आदेश बजावला आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या अहवालाची प्रत मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडे देण्यात यावी, परंतु सुनावणी तहकूब केल्यामुळे मंगळवारपर्यंत त्याचा मृतदेह जतन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.


प्रकरण नेमके काय ?
लावारसान नावाच्या तरुणाचा विवाह एका उच्च् जातीमधील तरुणीशी झाला होता, परंतु या विवाहाला एका गटाकडून विरोध होता. परिणामी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन गटांतील संघर्ष तीन गावांत पसरून हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून दोन गटांत कायम धुसफूस चालू होती. त्यातच लावारसानची पत्नी दिव्याने पतीला कायमचे सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या तासाभराने लावारसानचा मृतदेह रेल्वेरुळानजीक आढळून आला.