आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Mukherjee Host A Lunch For 100 Women Achievers

या लेडी IPS चा राष्ट्रपतींकडून सन्मान, रेप केसमध्ये घेतला होता कमिश्नरसोबत पंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाबाद (हरियाणा) - देशातील 100 सशक्त महिलांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमात हरियाणाच्या पाच महिलांचा समावेश होता, त्यात हरियाणाच्या 1998 बॅचच्या आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनाही सन्मानित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादामुळे आयपीएस भारती चर्चेत आल्या होत्या.

हरियाणातील पाच महिलांचा सन्मान
फेसबुकच्या माध्यमातून देशातील 250 महिलांमधून 100 सशक्त महिलांची निवड करण्यात आली. यात हरियाणाच्या पाच रणरागिणींचा समावेश आहे. त्यात डॉ. संतोष दहिया यांची वूमन इन पब्लिक लाइफ श्रेणीत निवड करण्यात आली. आयपीएस भारती अरोरा यांची महिला अधिकारी म्हणून तर आंतरराष्ट्रीय खेळाडू ममता खरब हिची क्रीडा विभागत निवड करण्यात आली.
केंद्रीय महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्या महिलांना राष्ट्रपतींसोबत लंचसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

दुष्कर्माच्या प्रकरणात आपल्याच अधिकाऱ्यासोबत भिडल्या होत्या अरोरा
भारती अरोरा या गुडगावच्या पोलिस सहआयुक्त होत्या. त्या दरम्यान एका दुष्कर्म प्रकरण तपासावेळी त्यांचा पोलिस आयुक्त नवदीपसिंग विर्क यांच्यासोबत वाद झाला होता. अरोरा यांनी आरोप केला होता की विर्क या प्रकरणात एका निर्दोष व्यक्तीला अडकवण्यासाठी दबाव आणत आहेत. राज्यातील निडर पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पाहा राष्ट्रपती भवनातील देखण्या सोहळ्याचे फोटोज्...