आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींसोबत यांचे आहे थेट कनेक्शन, मित्र-मैत्रिणींना कळाल्यावर त्यांनाही बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर इंडियाच्या सर्वोत्तम क्रू मेंबर्सपैकी स्वाती एक आहे. - Divya Marathi
एअर इंडियाच्या सर्वोत्तम क्रू मेंबर्सपैकी स्वाती एक आहे.
लखनऊ - देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद विजयी झाले आहेत. 25 जुलै रोजी ते राष्ट्रपती पदाची शपथ ग्रहण करतील. त्यांच्या मूळगावी अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे एअर इंडियामध्येही उत्साहवर्धक वातावरण आहे. त्याचे कारण म्हणजे रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वाती एअर इंडियामध्ये एअर होस्टेस आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूरोप सारख्या लांब पल्ल्यांच्या एअर इंडियाच्या बोइंग 777 आणि 787 सारख्या एअरक्राफ्टमध्ये स्वाती एअर होस्टेस आहे. काही दिवसांपासून एअर इंडियाचे खासगीकरण होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती होत असल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. 
 
स्वाती नावासोबत लावत नाही आडनाव 
- मीडिया रिपोर्टनुसार, एअर इंडियातील सूत्रांच्या माहितीनुसार, 'एअर इंडियाच्या सर्वोत्तम क्रू मेंबर्सपैकी स्वाती एक आहे. राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही तिच्या कामावर त्याचा कधीही परिणाम जाणवलेला नाही.'
-    स्वातीने काही दिवसांपुर्वीच प्रिव्हलेज लिव्हसाठी अर्ज केला होता. त्यावेळीही तिने वडिलांच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सुटी घेत असल्याचे सांगितले नाही.
- स्वाती तिच्या नावासोबत आडनाव लावत नाही. ऑफिशियल रेकॉर्डनुसार तिने आईचे नाव सविता आणि वडिलांच्या नावाच्या ठिकाणी आर.एन. कोविंद लिहिलेले आहे. 
 
गुरुवारी कळाले ही भावी राष्ट्रपतींची मुलगी 
कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर कळाले ही त्यांची मुलगी आहे, असे स्वातीच्या टीममधील सहकाऱ्यांनी सांगितले आहे. 
- बोइंग-777 आणि 787 एअरक्राफ्टमध्ये अनेक सफरी सोबत केलेल्या क्रू मेंबर्सलाही गुरुवारी कळाले की स्वाती ही त्यांची मुलगी आहे. 
- आता एअर इंडियाचे काही कर्मचारी हे रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची भेट घेणार आहेत. एअर इंडियाचे होणारे खासगीकरण थांबवण्यासाठी ते विनंती करणार आहेत. 
 
 मेव्हणेही एअरलाइनमध्ये
 - कोविंद यांचे मव्हणे सी.शेखर हे एअरलाइनमधून इन-फ्लाइट सुपरवायझर पदावरुन निवृत्त झाले आहेत. शेखर हे एअर इंडिया कॅबिन क्रू मेंबर्स असोसिएशन (AICCA) उपाध्यक्ष होते. 
 
 अभिनंदन सोहळ्याला उपस्थित होती स्वाती 
 - रामनाथ कोविंद यांच्या विजयानंतर 10, अकबर रोड येथे झालेल्या अभिनंदन सोहळ्यासाठी कोविंद यांच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती, मुलगा प्रशांत उपस्थित होते. त्यासोबतच सून, नात-नातू देखील उपस्थित होते. 
 - स्वाती म्हणाली, की मी कधी विचारही केला नव्हता की माझे वडील राष्ट्रपती बनतील. एनडीएने त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केले त्या दिवसापासूनच ते राष्ट्रपती होणार असा विश्वास वाटत होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वातीचे देश-विदेशातील फोटो...
बातम्या आणखी आहेत...