आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमधील पुरोहितांना पेन्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - उपजीविकेसाठी स्थलांतर करणा-या पुरोहितांना स्थैर्य प्रदान करण्याच्या हेतूने त्यांना दरमहा ८०० रुपये पेन्शन देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. मागील कित्येक वर्षांपासून पुरोहित त्यांची उपजीविका भागवण्यासाठी स्थलांतर करत आहेत. त्यांना यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे उत्तराखंडचे मुख्य अतिरिक्त सचिव एस.राजू यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील स्थलांतरित पुरोहितांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी समाजकल्याण मंत्रालयाला दिले. मात्र, स्थैर्याचा तसेच उपजीविकेचा प्रश्न समोर नसल्याने हिमालयाच्या कुशीतील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री भागात राहणारे पुरोहित या योजनेत समाविष्ट होऊ शकणार नाहीत, असे सचिवांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उत्तराखंड भाजपचे प्रवक्ते सुरेश जोशी यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. ही योजना राजकीय हेतूने प्रेरित असून ब्राह्मण समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ती अस्तित्वात आणण्याचा
प्रयत्न चालवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.