आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पूजेच्या बहाण्याने मंदिर परिसरातच पुजार्‍याने केला महिलेवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- तेलंगाणामधील एका मंदिरातील पुजार्‍याचा काळा चेहरा समोर आला आहे. त्याने मंदिर परिसरात एका 45 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. भामट्या पुजार्‍याच्या हातात पोलिसांनी बेड्या टाकल्या आहे.

विशेष पुजेच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला मंदिरात बोलावले नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. विठ्ठलवाडी भागातील एका मंदिर परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदिरात महिलेला रडत बसली होती. मंदिराचा पुजारी रामा ऊर्फ रामू (26) याने तिला पाहिले. त्याने महिलेची समस्या जाणून घेतली. तिला धीर दिला. इतकेच नाही तर तिला समस्येचे निवारण करण्‍यासाठी एक विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला. महिलेला पुजार्‍याने पूजेच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

नारायण गुदा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस निरीक्षक एस. भीम रेड्डी यांनी सांगितले की, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक केले आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, विशेष पूजेसाठी हळद व 5 लिंबू...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...