आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MODI GOVT@1 YEAR: वन रँक वन पेंशन योजनेची घोषणा होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (उत्तर प्रदेश) - केंद्रात भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमीत्त सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपोर्ड कार्ड सादर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेत त्यानिमीत्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान लष्करासाठी वन रँक-वन पेंशन या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनूसार अनेक दिवसांपासून वन रँक वन पेंशनची मागणी केली जात होती. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली होती.
मथुरेत नगला चंद्रभानमध्ये सभेची जय्यत तयारी सुरु आहे. हे गाव पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मभूमी आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
मोदी सोमवारी दुपारनंतर ३.४५ वाजता हेलिकॉप्टरने दीनदयाळ धाम हेलिपॅडवर पोहोचतील. येथून ते ३.५५ वाजता पं. दीनदयाळ स्मारकाकडे जातील. तेथे ते तीस मिनिटे थांबतील. यानंतर ४.३० वाजता त्यांचे भाषण होईल. सायंकाळी ६.०५ वाजता दिल्लीला रवाना होतील.
बातम्या आणखी आहेत...