आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi In Haryana To Inaugurate A Road Project

हरियाणात मोदी-हुडा एकाच मंचावर, म्हणाले प्रेमाची परतफेड विकासाने करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : हरियाणाच्या कॅथलमध्ये रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
कॅथल - पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सरकारी कार्यक्रमासाठी मंगळवारी कॅथल येथे पोहोचले. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचआय) च्या या कार्याक्रमामध्ये मोदींनी कॅथल ते हरियाणा-राजस्थानच्या सीमेपर्यंत 160 किलोमीटरचा हायवे चाल लेनचा करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. मोदींनी या काळात एका रॅलीला मार्गदर्शन करताना विकासाचे आश्वासन दिले. यावेळी मोदींबरोबर मंचावर हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुडा हेही उपस्थित होते.

मोदी म्हणाले, प्रेमाची परतफेड करणार
कॅथलमध्ये मोदींनी विकासाच्या मुद्यावर जोरदार भाषण केले. मला दीर्घ काळासाठी हरियाणामध्ये राहण्याचे भाग्य लाभले आहे. येथे मी बरेच काही शिकलोही आहे. हरियाणाच्या जनतेने माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाची मी ऋणी आहे. या प्रेमाची परतफेड मी विकासाद्वारे करणार आहे. जग पुढे चालले आहे, आपल्यालाही पुढेच जायचे आहे. त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणदे विकास, असे मोदी म्हणाले.

हरियाणाचे कौतुक
मोदींनी यावेळी हरियाणाचे भरपूर कौतुक केले. काल देशभरात जन्माष्टमी साजरी केली जात होती. जेव्हा श्रीकृष्णाची आठवण काढली जाते, तेव्हा कुरूक्षेत्राची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हरियाणा ही कुरूक्षेत्राची धरती असल्याचे सांगून, येथे युद्धाच्या मैदानावर शाश्वत शांतीचा संदेश देण्यात आला होता, असे ते म्हणाले.

'मी' पणामुळे झाले नुकसान
माझे काय आणि मला काय या वृत्तीने देशाचे मोठे नुकसान केले. देशाची भ्रष्टाचारापासून मुक्तता करावी लागणार आहे. पहिल्याच पावसात नाहीशा होणा-या सोयीसुविधा नकोत. गेल्या शतकातील विकास आता चालणार नाही. सगळ्या समस्यांचा तोडगा विकास हाच आहे. पुढे जाण्यासाठीही विकास हाच एकमेव मार्ग आहे.

पुढे वाचा - हरियाणा दौ-याचा भाजपला होणार फायदा