आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबात PM मोदी म्हणाले- भारतीय सैन्याच्या ताकदीचा पाकने जवळून अनुभव घेतलाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भठिंडा येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते एम्स हॉस्पिटलचे भूमिपुजन झाले. - Divya Marathi
भठिंडा येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते एम्स हॉस्पिटलचे भूमिपुजन झाले.
भठिंडा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला आव्हान दिले आहे. येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, येथून पाकिस्तान दूर नाही. सीमेवर राहाणाऱ्यांना सीमेपलिकडून होणारे अत्याचार सहन करावे लागतात. भारतीय सैन्यात काय ताकद आहे, हे पाकिस्तानने आता पाहिले आहे. आमच्या सैन्याने त्याचा परिचय करुन दिला आहे. पाकिस्तानला आता लढायचेच असेल तर त्यांनी भ्रष्टाचार, काळापैसा आणि गरीबीविरोधात लढले पाहिजे.

आणखी काय म्हणाले मोदी
- मोदी म्हणाले, लष्काराच्या जवानांच्या हातात शस्त्र आहे, लढण्याची ताकद आहे, पराक्रम दाखवण्याची हिंमत आहे पण ते पराक्रम दाखवू शकत नव्हते.
- जेव्हा आमच्या जवानांनी बहादुरीने सर्जिकल स्ट्राइक केले, त्यानंतर सीमेपलिकडे भूकंप झाला. अजूनही ते स्थीरस्थावर झालेले नाही.
- आज मी पाकिस्तानच्या शेजारी उभा आहे. समीवेर उभा आहे. येथे उभा राहून मी पाकिस्तानच्या जनतेला सांगू इच्छितो की आम्ही भारतीय आहोत.
- जेव्हा पेशावरमध्ये लहान मुलांवर गोळीबार झाला तेव्हा सव्वाशे कोटी भारतीयांच्या डोळ्यात अश्रू होते.
- पाकिस्तानच्या जनतेने त्यांच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. लढायचे असेल तर भ्रष्टाचाराविरुद्ध, काळ्या पैशांविरोधात लढा उभारा.
- पाकिस्तानने गरीबीविरोधात लढले पाहिजे. भारतासोबत भांडण उकरून ते स्वतःला उद्धवस्त करुन घेत आहेत. विनाकारण निरपराधांच्या मृत्यूला जबाबदार ठरत आहेत. पाकिस्तानी नागरिकांनाही गरीबीपासून मुक्ती हवी आहे.
सिंधू पाणी करारावर काय म्हणाले पंतप्रधान
- पंतप्रधान म्हणाले, सतलुज-व्यास-रवि या तीन नद्यांच्या पाण्यातील भारताच्या हक्काचे जे पाणी आहे ते भारतीय शेतकऱ्यांना मिळत नाही. ते खरे तर तुमच्या शेतात यायला पाहिजे. मात्र पाकिस्तानातून ते समुद्राला मिळत आहे. पाकिस्तानही त्याचा वापर करत नाही, ना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात ते खेळते.
- पंतप्रधान म्हणाले, यासाठी मी टास्क फोर्स तयार केली आहे. भारताच्या हक्काचे पाणे जे पाकिस्तानात वाया जात आहे. त्यातील थेंबन थेंथ अडवून पंजाबच्या शेतकऱ्यांना मिळवून देईल.
- माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी खेळावे ही माझी इच्छा आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पाकिस्तानच्या कुरापती..
बातम्या आणखी आहेत...