नवी दिल्ली - रेल्वे भाडेवाढीनंतर नरेंद्र मोदी सरकार लवकरच जनतेला दुस-या कठोर निर्णयाचा डोस देण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गॅसच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सरकार याच आठवड्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढवण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने सोमवारी साखरेवरील आयातशुल्कात वाढ केल्याने साखर प्रतिकिलोमागे 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांतली ही त्यांची दुसरी भेट होती. मोदींनी शुक्रवारी देशातील वीजेच्या परिस्थितीबाबत सुमारे पाच तास चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी पुन्हा एकदा प्रधान यांना बोलावणे पाठवले. अर्थमंत्री अरुण जेटली यांचाही बैठकीत समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत नैसर्गिक गॅसचे दर ठरवण्याच्या मुद्यावर तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला जाऊ शकतो, असेही मत व्यक्त करण्यात आले. सरकार मात्र दर वाढवण्याबाबत द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मात्र, दर वाढवले नाही तर त्याचा परिणाम गॅस उत्पादन आणि एफडीआयवर पडू शकतो. त्यामुळे सीएनजीचे दर किलोमागे 2.81 रुपयांनी तर पाइपद्वारे पुरवठा करण्यात येणा-या स्वयंपाकाच्या गॅसचे दर 1.89 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरम एवढे वाढतील.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी युपीए सरकारने नैसर्गिक गॅसचे दर एक एप्रिल 2014 पासून दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे दर 4.2 डॉलरवरुन 8.4 डॉलर प्रति युनिटवर जाणार होते. पण निवडणुकांमुळे हा निर्णय लांबला होता. त्यामुळे एक जुलैपूर्वी नवीन दरांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
होणारा परिणाम
प्राकृतिक गैसचे दर प्रति युनिट एक डॉलरनेही वाढले तरी युरीयाच्या उत्पादनासाठी लागणा-या भांडवलामध्ये 1,370 रुपये प्रति टन एवढी वाढ होईल. तर वीजेच्या बिजली उत्पादनासाठीही प्रति युनिट 45 पैसे अधिक लागतील.