आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MODI@365: \'वाईट गेले, चांगले दिवस आले\', पंतप्रधानांचा मथुरेत दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- वाईट दिवस गेले असून चांगले दिवस आल्याचा आल्याचा दावा आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मथुरेत केला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मथुरेत पहिली सभा घेऊन भाजपच्या जनकल्याण यात्रेची घोषणा केली.

'मथुरा ही कृष्णाची भूमी आहे. कृष्णाने कर्माचे महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे येथे जन्मलेले पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनीही काम करत रहा, थांबू नका, फळाची अपेक्षा करू नका, असाच संदेश दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. सभेत विविध मुद्यांवर चर्चा करत नरेंद्र मोंनी भाजप सरकारच्या एक वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला.

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय धाम येथे जाऊन त्यांंना आदरांजली अर्पण केली. पंडीत उपाध्याय यांचे आयुष्य प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
पंतप्रधानांच्या भाषणाच्या HIGHLIGHTS:
05: 48 PM- देशातील गरीब, दलित, शोषित, वंचितांच्या सर्वागिण कल्याणासाठी काम करणार

05: 46 PM- 365 दिवसांत सरकारने जे काम केले आहे ते सांगण्यासाठी 365 तासही कमी पडतील. प्रत्येक क्षणाला भाजप सरकारने नवा निर्णय घेतला आहे. मी कधीच स्वस्थ बसणार नाही, तसाच कधी सुटीवरही जाणार नाही, हे यापूर्वीच सांगितले आहे.

05: 45 PM- पोट भरण्यासोबत स्वत:चे घर असावे, त्याच वीज असावी, शौचालय असावे, असे गरीब जनतेचे स्वप्न असते. सन 2022 पर्यंत देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
05: 44 PM - गंगा- यमुना या दोन्ही माझ्या माती आहेत- पंतप्रधान
05: 41 PM- देशातील प्रत्येक गावात, घरात शौचालय असावे- पंतप्रधान
05: 39 PM- छोट्या उद्योजकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्र विक्रेत्यांचाही त्यात समावेश असेल.
05: 38 PM- देशात स्किल डेव्हलपमेंटने यशस्वी काम केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येत सहा लाखाने वृद्धी झाली आहे.

05: 35 PM- आम्ही अटल पेंशन योजना सुरु केली. या योजनेर्तंगत 60 वर्षांनंतर शेतकर्‍यांना पेंशन मिळेल. शेतकर्‍यांनी त्यात आतापासून पैसे जमा केल्यास 60 वर्षांनंतर त्यांना त्याचा पेंशन स्वरुपात मोबदला मिळेल. सरकार देखील त्यात आपला पैसा टाकेल. शेतकर्‍यांची म्हातारपण सुखात जाईल. यदाकदाचित शेतकर्‍याच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये मिळतील.
05: 30 PM- 12 रुपयांत तर बोळवणही मिळत नाही. मात्र, प्रत्येक महिन्यात एक रुपयाप्रमाणे वर्षाला 12 रुपयांत दोन लाख रुपयांचा विमा योजना भाजप सरकारच्या कार्यकाळात सुरु झाली आहे.

05: 28 PM- येणार्‍या काही दिवसांत देशातील सुमारे 1300 कायदे संपुष्टात येतील

5: 28 PM - आता देशातील कोणत्याही पेंशनरला वर्षाच्या सुरवातीला हयातीचा दाखला द्यावा लागणार नाही. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे.
05: 26 PM- देशातील प्रत्येक निराधार व्यक्तीला एक हजार रुपये महिना पेंशन मिळेल .

05: 23 PM-येत्या पाच वर्षांत नद्या जोडणी प्रकल्प, पाणी अडवा- जिरवा धोरण असो किंवा सगळ्या शेतक-यांना पाणी मिळण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना लागू करणार.

05:20 PM - शेतक-यांच्या आत्महत्या लाखाच्या घरात गेल्या आहेत. यावर राजकारण न करता यावर उत्तर शोधायला हवं, मार्ग काढायला हवा हे आमचं धोरण आहे. यासाठी 'सॉइल हेल्थ कार्ड' हे त्या दिशेने उचललेले पाऊल अाहे.

05:18 PM - खत उत्पादन करणार्‍या कंपन्यांची क्षमता वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 20 लाख टन जास्त उत्पादन होईल आणि चार लाख कोटी रुये युरीया आयातीमध्ये वाचणार आहेत.
05:12 PM- मनरेगा, गॅस सबसिडी आदी योजनांच्या माध्यमातून थेट लोकांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा होते.
05:04 PM- दिल्लीमधली सगळी दलालांची दुकाने आम्ही बंद केली असून अशा भ्रष्टाचा-यांसाठी वाइट दिवस आले आहेत. - पंतप्रधान
04:55 PM - महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया व दीनदयाळ उपाध्याय या तिघांच्या चिंतनाचा भारतीय राजकारणावर परिणाम झाला आहे. तिघांनी नेहमीच भारताच्या तळाच्या माणसाचा विचार केला.

04:53 PM - भाजप सरकार हे गरीबांचे सरकार आहे. भ्रष्टाचार बंद करण्याचं आश्वासन मी जनतेला दिलं होतं, जे आश्वासन एका वर्षात मी पाळलं आहे. ज्या कोळशाच्या खाणी आधीच्या सरकारने लुटल्या त्यातून आता लाखो कोटी रुपये सरकारला मिळणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

04:52 PM- भाजप सरकारमुळे देशात परिवर्तन घडून आले आहे. आधीच्या सरकारच्या काळात जनतेने वाईट दिवसांना सामोरे जावे लागले. आधी देशात घोटाळे होत होते, रीमोर्ट कंट्रोलवर सरकार चालत होते, नेते तुरूंगात जात होते, कोळसा, स्पेक्ट्रममध्ये पैसे खाल्ले जात होते, असे सांगत मोदींनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.
04:50 PM- महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया व दीनदयाळ उपाध्याय या तिघांच्या चिंतनाचा भारतीय राजकारणावर परिणाम झाला आहे. तिघांनी नेहमीच भारताच्या तळाच्या माणसाचा विचार केला.

नगला चंद्रभान पंडीत उपाध्यायांची जन्मभूमी...
मथुरेतील नगला चंद्रभान ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मभूमी आहे. आजपासून (सोमवार) भाजपचे जनकल्याण पर्व सुरु झाले असून पंतप्रधान मोदी पहिली सभा मथुरेतील नगला चंद्रभान येथे घेतली. या सभेत मोदी एक वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला.
मोदींना ऐकण्यासाठी मथुरावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपने केंद्रात सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात 200 सभा आयोजित केल्या आहेत. त्यापैकी पहिली सभा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मथुरा येथे होत आहे.

मुख्यमंत्र्यांची दांडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मथुरा येथे सभा आहे. परंतु या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित नाही. मुख्यमंत्री परराष्‍ट्राच्या दौर्‍यावर असल्यामुळे ते मोदींच्या स्वागताला उपस्थित राहु शकले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे मंत्री बलराम यादव यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (संघटन) रामलाल, प्रदेश भाजप प्रभारी ओम माथुर, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, मानवसंसाधन विकास राज्‍य मंत्री डॉ. रामशंकर कठेरिया, पर्यटन मंत्री महेश शर्मा आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी उपस्थित आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...