आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Uttar Pradesh Visit

आंबेडकर विद्यापीठात \'मोदी गो बॅक\'चे नारे, PM नी केला रोहितचा उल्लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. लखनऊमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी रोहित वेमुलाचा उल्लेख केला. त्याआधी पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरोधात काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. 'नरेंद्र मोदी मुर्दाबाद', 'मोदी गो बॅक'च्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. त्यांना बाहेर काढल्यानंतर मोदींनी भाषणाला सुरुवात केली.

हैदराबाद विद्यापीठातील दलित स्कॉलर रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर भावूक झाले मोदी
- पंतप्रधान मोदींनी भाषणात रोहित वेमुलाचा उल्लेख केला. यावेळी ते भावूक झाले. काही वेळ ते शांत राहिले आणि त्यानंतर पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.
- मोदी म्हणाले, रोहितला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही.
- पंतप्रधान म्हणाले, 'कारणे आपल्या जागेवर आहेत. राजकारण आपल्या जागेवर आहे. मात्र सत्य हे आहे की माँ भारतीने आपला एक लाल गमावला आहे.'
- मोदी पुढे म्हणाले, 'त्याच्या कुटुंबावर कोणते दुःख कोसळले असेल ?'
डीएलडब्ल्यू मैदानावर दिव्यांग व्यक्तींना हेल्पिंग किट
वाराणसीतील डीएलडब्ल्यू मैदानावर दिव्यांग व्यक्तींना हेल्पिंग किट दिल्यानंतर ते महामना एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील. दरम्यान मोदी राज्यात आल्यानंतर त्यांच्या औपचारिक स्वागतासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव पोहोचले नाही.

वाराणसीत दिव्यांगांच्या बसला अपघात
- मोदींच्या कार्यक्रमासाठी येत असेल्या दिव्यांग व्यक्तींच्या बसचा अपघात झाला. यात 15 जण जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिव्यांगांना देणार किट
- डीएलडब्ल्यू मैदानावर दिव्यांग व्यक्तींना पंतप्रधानांच्या हस्ते हेल्पिंग किट दिली जाणार आहे. त्यात ट्राय सायकल, मोबाइल फोन, व्हिल चेअर, कर्णबधिरांसाठी यंत्र, सेंसर असलेले ब्लाइंड किट, टॅबलेट आणि स्मार्टफोन.
- पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात अपंगांसाठी 'दिव्यांग' हा शब्द प्रयोग केला होता.

महामना एक्स्प्रेसला दाखवणार हिरवी झेंडी
- शुक्रवारी मोदी वाराणसी कँट स्टेशनहून वाराणसी व्हाया लखनऊ दिल्ली जाणाऱ्या महामना एक्स्प्रेस गाडीला हिरवी झेंडी दाखवणार आहेत.
- महामना एक्स्प्रेस दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार धावणार आहे.
- वाराणसीहून ही गाडी सायंकाळी 6.35 वाजता रवाना होईल.
- लखनऊच्या चारबाग स्टेशनवर रात्री 11.50 वाजता पोहोचेल आणि 11.58 ला सुटेल.
- महामना एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.
- नवी दिल्लीहून महामना एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी रवाना होईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महामना एक्स्प्रेसचे आतील फोटो