आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंतेवाडात ३० वर्षांनी पंतप्रधानांचा दौरा, हिंसाचार सोडण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंतेवाडा/ जगदलपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नक्षलवाद्यांचा गड असलेल्या दंतेवाडात पोहोचले. त्यांनी बस्तरच्या विकासासाठी २४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करारावर स्वाक्षरी केली. या भागातून नक्षलवादाचा खात्मा होईल, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. मी पूर्ण प्रामाणिकपणे देशाचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

नक्षलग्रस्त दंतेवाडात ३० वर्षांनंतर पंतप्रधानांचा दौरा झाला आहे. जाहीर सभेत मोदी म्हणाले की,ज्या नक्षलवाडीतून नक्षलवादाचा जन्म झाला तेथेच त्याचा खात्माही झाला आहे. येथील नक्षलवादही संपेल, असा विश्वास मी देऊ इच्छितो. मुलांच्या हातात बंदुका देण्याची नक्षलींची इच्छा होती, पण मुख्यमंत्री रमणसिंह यांनी त्यांच्या हातात लेखणी दिली. हिंसेला भवितव्य नसते, असे सांगून मोदी म्हणाले की, नक्षलींनी एक प्रयोग करावा. त्यांनी गणवेश सोडून आदिवासींचे कपडे परिधान करावेत. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांमध्ये पाच दिवस राहावे.आपण कोण आहोत हे त्यांना सांगू नका. फक्त त्यांच्या मुलांशी चर्चा करा. जेव्हा तेआपले अनुभव सांगतील तेव्हा तुम्ही (नक्षली) आपल्या मार्गावर
चालण्याबाबत फेरविचार करण्यास बाध्य होतील. यावेळी त्यांनी रमणसिंह सरकारची स्तुतीही केली.

विरोेधकांवर टीका
काँग्रेस आणि यूपीएचा नामोल्लेखही न करता मोदी म्हणाले, ‘लोकांनी ६० वर्षे काहीच दिले नाही. गरिबांना उपाशी ठेवण्यातच त्यांना आनंद मिळाला. जनतेने त्यांना नाकारले. त्यांना कामच उरले नसल्याने ते संशय निर्माण करत आहेत.’