आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकशाहीत राजेशाहीचा \'ड्रामा\'; यदुवीर झाले म्हैसूरचे 27 वे राजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डूंगरपूरची राजकुमारी तृषिका आणि म्हैसूरचे राजे यदुवीर वडियार)

म्हैसूर/डूंगरपूर- यदुवीर कृष्णदत्त वडियार हे वयाच्या 23 व्या वर्षीच म्हैसूरचे 27 वे राजे झाले आहेत. गुरुवारी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी अमेरिकेतून इंग्रजी आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. राजस्थानमधील डूंगरपूरचे राजा हर्षवर्धन यांची कन्या तृषिकासोबत येत्या डिसेंबरमध्ये यदुवीर यांचा विवाह होणार आहे.
राजे यदुवीर हे त्यांचे चुलत आजोबा श्रीकांतदत्त वडियार यांच्या गादीवर विराजमान झाले आहेत. डिसेंबर 2013 मध्ये श्रीकांतदत्त वडयार यांचे निधन झाले होते. श्रीकांतदत्त यांना अपत्य नव्हते. पत्नी प्रमोददेवी यांनी नुकतेच यदुवीर यांना दत्तक घेतले. राज्याभिषेक सोहळ्याला डूंगरपुरच्या राजघराण्याची राजकुमारी आणि म्हैसूरची होणारी राणी तृषिका पोहोचली होती.

10 हजार कोटींच्या मालमत्तेचे मालिक
राजा-राणीच्या गोष्‍टी आपण पुस्तकात वाचल्या असतील. परंतु अजुनही देशातील अनेक राज्यांत लोकशाहीत राजेशाहीची परंपरा सुरुच आहे. म्हैसूर हे देखील त्या पैकी एक आहे.
> वडियार राजपरिवाराकडे 10 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
> म्हैसूर, बंगळुरु व हासनमध्ये 1500 एकर जमीन. परंतु सध्या त्यावरून वाद सुरु आहे.
> कर्नाटक सरकारविरोधात महलाचा ताबा घेण्याच्या तयारीत वाहे.
> श्रीकांतदत्त वडियार यांच्या 15 लक्झरी कार, सर्व कारचा नंबर 1953 असा आहे. 1953 हे श्रीकांतदत्त यांचे जन्मवर्ष आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, म्हैसूरचा नवनिर्वाचित राजे यदुवीर यांच्या राज्याभिषेकाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...