तेजपूर- ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी डचेस ऑफ कॅम्ब्रिज केट मिडलटन भारताच्या दौऱ्यावर आहेत. विल्यम्स व केट मिडलटन आज (बुधवारी) आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कच्या सफारीवर आहेत. रॉयल कपल दिवसभर पार्कमध्ये थांबणार असून आसामचा पाहुणचार घेणार आहेत. शाही दाम्पत्य जगातील सर्वात तिखट मिरची 'भुत जोलोकिया' देखील टेस्ट करू शकतात.
शाही दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी आसाममध्ये पोहोचले. बुधवारी सकाळी काझीरंगा नॅशनल पार्कच्या रेंजर्ससोबत त्यांनी संवाद साधला.
विल्यम्स यांना तिखट पदार्थ पसंत नाही...- प्रिंस विल्यम्स व केट काजीरंगा येथील आयओआरए रिसॉर्टमध्ये थांबले आहेत.
- जेवणात त्यांना 'भुत जोलोकिया' मिरचीचे पदार्थ सर्व्ह केले जाणार असल्याचे रिसॉर्टचे व्यवस्थापक प्रशांतकुमार शर्मा यांनी सांगितले. आसाममधील काही पारंपरिक डिशेस देखील सर्व्ह करण्यात येणार आहेत.
- मात्र, विल्यम्स यांना तिखट पदार्थ पसंत नसल्याचे त्यांना मुंबईत सांगितले होते.
- आसाम व्हिजिटनंतर शाही दाम्पत्य भूतानला रवाना होणार आहे. 14 ते 15 एप्रिल भूतानचा दौरा करून पुन्हा भारतात येऊन ताजमहालला भेट देणार आहे.
पुढील स्लाडवर पाहा, प्रिन्सेस केटच्या ड्रेसची आहे जगभरात चर्चा, भारतात आल्यानंतर असा बदलला Look