आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुघल बादशहा अकबराचे वंशज ख्वाजाच्या दरबारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर- ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये मुघल बादशहाच्या काळातील दरबारी वातावरण मंगळवारी पुन्हा पाहायला मिळाले. बादशहा अकबर यांचे वंशज प्रिन्स याकूब हबीब उदीन तुसी मुघल बादशहाच्या वेशात ख्वाजा साहबच्या दर्शनासाठी आले. पहिल्यांदाच येथे जियारत करायला आलेल्या तुसी यांनी ख्वाजांच्या मजारवर मखमली चादर चढवली.

देशात भरभराट व राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी दुआ मागितली. तसेच शाही परंपरेनुसार १.२५ लाखांचा नजराणा अर्पण केला.
अकबराने केली होती पायी यात्रा
अकबराने १६५० मध्ये आग्रा ते अजमेर असा ४५० किमीचा पायी प्रवास करून ख्वाजाचे दर्शन घेतले होते. प्रिन्स तुसी यांनी सांगितले, अकबराने अाग्रा ते अजमेरपर्यंत शेकडो मिनार बांधले होते. त्यांची आज दुर्दशा झाली आहे. त्याबाबत आपण पंतप्रधान मोदी व पुरातत्त्व विभागाला पत्र लिहिणार आहोत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो....